Friday, May 24, 2024
Homeनाशिकतलाठी महिलेचा छळ; प्रांतअधिकाऱ्यावर गुन्हा

तलाठी महिलेचा छळ; प्रांतअधिकाऱ्यावर गुन्हा

नाशिक | प्रतिनिधी Nashik

तलाठी महिलेला घरी बोलावून जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी येवल्याचे प्रांताधिकारी सोपान कासार (Yeola Divisional Officer Sopan Kasar) यांच्याविरोधात येवला पोलीस ठाण्यात (Yeola Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रांत अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे प्रशासकीय यंत्रणेत खळबळ उडाली आहे….

- Advertisement -

संशयित प्रांत अधिकारी कासार यांच्यावर येवला तालुक्यातीलच एका महिला तलाठीने (Woman Talathi) गंभीर आरोप करत लैंगिक छळ केल्याचा आरोप केला. या महिलेने येवला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीची दखल घेत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात करण्यात आला आहे.

महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, तलाठी महिलेला प्रांताधिकारी (Divisional Officer) यांनी ३ ऑगस्ट २०२० रोजी घरी बोलावले होते. यावेळी या महिलेला त्यांनी जबरद्स्ती करत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. पीडित महिलेला प्रांतअधिकारी कासार यांचा हेतू लक्षात येताच तिथून निघून घेल्या.

याबाबतचा राग मनात धरत प्रांताधिकारी कासार यांनी जाणीवपूर्वक बदली केल्याचा आरोप या महिलेने फिर्यादीत म्हटले आहे.

बदली झाल्यावर पीडितेने मॅट(Maharashtra Administrative Tribunal) कोर्टात दाद मागितली असून याबाबत निकाल बाकी आहे. तरी प्रांताधिकारी कासार यांनी पीडितेला मॅट कोर्टाचा निकाल येऊ दे, हिला बडतर्फ करतो अशा धमक्या दिल्या असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

१४ ऑगस्ट रोजी करोना आढावा बैठकीनंतर पीडितेने आपल्या व्यथा मांडण्यासाठी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना भेटण्याचा प्रयत्न केला असता मॅट न्यायालय निर्णय देईल असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या