Friday, May 16, 2025
Homeनाशिककामावर हजर न होणाऱ्या मालेगावमहापालिकेच्या ३३ सेवकांवर गुन्हा

कामावर हजर न होणाऱ्या मालेगावमहापालिकेच्या ३३ सेवकांवर गुन्हा

मालेगाव | प्रतिनिधी 

- Advertisement -

मालेगाव पालिकेतील 33 सेवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिकेतील सर्व सेवक हे मानधनावर काम करत असून नुकतीच त्यांची भरती करण्यात आली आहे. मालेगावमध्ये करोना विषाणूने थैमान घातले असून कर्मचारी करोनाच्या भीतीने घरात बसून आहेत. मात्र, कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी लेखी तक्रार आयुक्त दीपक कासार यांनी केली होती. त्यानंतर अग्निशमन विभागाच्या अधिकारी संजय पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार या कर्मचाऱ्यांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

करोनाच्या शिरकावानंतर मालेगावमध्ये परिस्थिती नाजूक झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात मालेगाव महापालिकेमध्ये वॉचमन, शिपाई पदावर काम करण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. यामध्ये कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली. यंत्र त्वरित १२ फेब्रुवारीपासून त्यांना कामावर रुजू करून घेण्यात आले होते.

मात्र, अनेक कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावण्यास नकार दिल्याचे दिसून येत आहे. महापालिकेकडून त्यांना वेळोवेळी फोन करून बोलविण्याबाबत प्रयत्न झाले. मात्र, चार ते पाच वेळा कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याबाबत सांगितले असतानाही अनेकांनी फोन बंद करून ठेवले आहेत. त्यामुळे कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी महापालिकेने संबंधित कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

सर्व कर्मचाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत १८८ प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.  मालेगाव मनपा प्रशासनाच्या इतिहासातील आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई समजली जात आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

वानखेडे

Wankhede Standium Stand: वानखेडे स्टेडीयमच्या स्टँड्सला रोहित शर्माचे, शरद पवार, अजित...

0
मुंबई | Mumbai भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा याच्या क्रिकेटमधील भरीव योगदानाचा गौरव म्हणून मुंबईच्या प्रसिद्ध वानखेडे स्टेडियममध्ये त्याच्या नावाने खास स्टँड उभारण्यात...