Sunday, May 19, 2024
Homeनगरआचारसंहिता भंगाच्या 188 तक्रारी; दहा प्रतिक्षेत

आचारसंहिता भंगाच्या 188 तक्रारी; दहा प्रतिक्षेत

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यातील नगर आणि शिर्डी या दोन्ही लोकसभा मतदारसंघांत आचार संहिता भंगाच्या 188 तक्रारी दाखल झाल्या आहेत. यापैकी 178 तक्रारींचे निराकरण करण्यात आले असून 10 कार्यवाहीच्या प्रक्रियेत आहेत. निवडणूक आयोगाने आचार संहितेचे उल्लंघन होत असल्यास तक्रार करण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध केले आहेत. मोबाईलवर सी-व्हिजिल अ‍ॅप डाऊनलोड करून त्या माध्यमातून तक्रार आणि फोटो पाठविण्याची व्यवस्था आहे. त्याच बरोबर नाव गोपनीय ठेवण्याचाही पर्याय आहे. ई-मेल, फोन आणि प्रत्यक्ष कार्यालयात येऊन ही तक्रार नोंदविण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

- Advertisement -

नागरिकांची सर्वाधिक पसंती मोबाईलवरून सी-व्हिजिल अ‍ॅप डाऊनलोड करून त्या माध्यमातून तक्रार करण्यास आहे. अहमदनगर मतदारसंघात 66 तक्रारी, शिर्डी मतदारसंघात 32 तर जिल्हास्तरावर 33 अशा एकूण 131 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. अ‍ॅपवरील तक्रारी विधानसभा मतदारसंघनिहाय नियुक्त केलेल्या सहायक निवडणूक निर्णय अधिकार्‍यांना पाठविल्या जातात. तक्रार ज्या भागातील आहे, त्या विभागासाठी कार्यरत असलेल्या भरारी पथकाला ही तक्रार पाठविली जाते. भरारी पथक घटनास्थळी जाऊन तक्रारीची खात्री करतात. तक्रारीत तथ्य असल्यास त्याबाबत कार्यवाही कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्था, शासनाच्या विभागकडे येते. त्या विभागाला कार्यवाही करण्यासाठी सूचित केले जाते.

ग्रामपंचायत हद्दीतील कार्यवाही असल्यास ग्रामपंचायतीचे पथक त्याठिकाणी जाऊन कार्यवाही करते. या अ‍ॅपवरील तक्रारीचे शंभर तासांमध्ये निरसन केले जात आहे. ई-मेल, फोन आणि प्रत्यक्षातील 57 तक्रारी प्राप्त आहेत. अहमदनगर मतदारसंघातील 46 तर शिर्डीतील 11 तक्रारींचा समावेश आहे. अशा 57 तक्रारी प्राप्त झाल्या असून 47 तक्रारींचे निवारण करण्यात आले. दहा तक्रारी कार्यवाहीच्या प्रक्रियेत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या