Tuesday, December 10, 2024
Homeजळगाव108 दिवसात नर्मदा परिक्रम पूर्ण ; भुसावळ विभागातील पहिलेच डॉक्टर

108 दिवसात नर्मदा परिक्रम पूर्ण ; भुसावळ विभागातील पहिलेच डॉक्टर

भुसावळ । प्रतिनिधी bhusawal

येथील रहिवासी व वासुदेव नेत्रालयाचे संचालक डॉ. नि.तु.पाटील यांनी 108 दिवसात माँ नर्मदा परिक्रमा यशस्वीपणे पूर्ण केली. डॉ.पाटील हे भुसावळ विभागातील पायी माँ नर्मदा परिक्रमा करणारे प्रथम तरुण डॉक्टर आहेत. तसेच त्यांचे तालुक्यातील मुळगाव तळवेल येथील पायी परिक्रमा करणारे हे पहिले व्यक्ती आहेत.

- Advertisement -

वासुदेव ज्येष्ठ नागरिक संघातर्फे सवाद्य मिरवणूक काढून परिक्रमावासी डॉ.नि.तु. पाटील यांचे स्वागत करण्यात आले. सहा एप्रिल हनुमान जन्मोत्सव या दिवशी डॉ.नि.तु. पाटील यांनी संकल्प करीत ओंकारेश्वर येथून माँ नर्मदा परिक्रमा उचलली आणि मग तिथून चालत चालत ते विमलेश्वर, गुजरातला गेले त्या ठिकाणी समुद्र पार करून मिठी तलाई ते नेमावर, मग पुढे माँ नर्मदा उगमस्थान अमरकंटक आणि मग तिथून परत ओंकारेश्वर असा संपूर्ण तीन हजार सहाशे किलोमीटरचा प्रवास चालत चालत 108 दिवसात पूर्ण केला. या प्रवासामध्ये वेगवेगळे अनुभव आणि अनुभूती आले. या परिक्रमामध्ये त्यांनी मध्यप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात आणि छत्तीसगढ ची सीमा या चार राज्यांचा प्रवास केला. विविध आश्रमांना, संतांना भेटी देत त्यांच्या आशीर्वाद घेतले. त्याबद्दल सगळे विविध अनुभव त्यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुकवर दिवसनुसार सर्वांसाठी लिहून ठेवले आहेत.

डॉ.नि.तु. पाटील हे भुसावळ विभागातील चालत माँ नर्मदा परिक्रमा करणारे प्रथम तरुण डॉक्टर असून त्यांचे मूळगाव तळवेल येथील पायी परिक्रमा करणारे हे पहिले व्यक्ती आहेत. 22 जुलैला त्यांना 108 दिवस पूर्ण झाले. 23 जुलैला त्यांनी अधिकृत पूजा करून ओंकारेश्वर आणि मलेश्वरी या ठिकाणी जल चढून परिक्रमा पूर्ण केली. यावेळी वासुदेव जेष्ठ नागरिक संघाचे धनराज पाटील, प्रभाकर झांबरे, प्रकाश पाटील, निलेश मालविया तसेच राजकीय पदाधिकारी प्रशांत पाटील, अतुल झांबरे, राजेंद्र चौधरी, परिक्षित बर्‍हाटे, रामाशंकर दुबे, चंद्रशेखर झोपे, प्रदीप भंगाळे, पिंटू कोठारी, गिरीश महाजन, निक्की बत्रा, सतीश सपकाळे, प्रवीण चौधरी, मुकेश पाटील, विशाल जंगले, अशोक ढाके आदी परिसरातील मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या