Tuesday, April 1, 2025
Homeक्राईमकॉम्पलेक्समधील पाच फ्लॅट फोडले

कॉम्पलेक्समधील पाच फ्लॅट फोडले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहरातील चांदणी चौक परिसरातील पुजा कॉम्पलेक्समधील बंद घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात समरीन फैजान तांबोळी (वय 24 वर्षे, रा. पुजा कॉम्पलेक्स, चांदणी चौक) यांनी दिलेल्या फियादीवरून चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी कटूंबासह शहरातील चांदणी चौक परिसरातील पुजा कॉम्पलेक्समध्ये वास्तव्यास आहे. तसेच पुजा कॉम्पलेक्समध्ये माधुरी शाहुराव शिंदे, सरोजिनी अरविंद हिवाळे, अमिता कोहली, डॉ.वेरोनिका फॅन्सीस, महेमुद खान देखील कुटुंबासह वास्तव्यास आहेत.

- Advertisement -

10 जुलै रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घराची कडी लावून पहिल्या मजल्यावरील नातेवाईकाच्या घरी गेल्या होत्या. दुपारी 4 नंतर पुन्हा परतले असता बंद घराचा दरवाजा उघडा दिसुन आला. त्यानंतर घरात जावुन पाहिले असता घरातील कपटामध्ये ठेवलेले सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. तसेच कपाटामध्ये ठेवलेली रोख रक्कमही गायब होती. दरम्यान समोरील घरामध्ये वास्तव्यास असणारे सरोजिनी अरविंद हिवाळे, अमिता कोहली यांचे बंद असलेल्या घराचे देखील कुलूप तुटलेले दिसले. तसेच शेजारी राहणार्‍या शिंदे याच्या देखील घराचे कुलूप व कडीकोयंडा तुटलेला दिसुन आला.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

नाशिक महानगर पालिकेकडून पुन्हा कर सवलत योजना

0
नाशिक । प्रतिनिधी Nashik मागच्या वर्षी शास्तीवर तब्बल 95 टक्के माफी देऊन अभय योजना महापालिकेकडून राबविण्यात आली होती, त्याला उत्तम प्रतिसाद मिळाल्यामुळे नियमित करदात्यांसाठी मनपाकडून...