नाशिक । प्रतिनिधी Nashik
माघ महिन्याच्या प्रतिपदेपासून सुरु झालेला गोदावरी नदीच्या पंधरा दिवसांचा जन्मोत्सवाची आज सांगता झाली. आज पोलीस आयुक्त संदीप कर्णिंक यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली या वेळेस महाप्रसाद वाटप करण्यात आला. गेले पंधरा दिवस रोज सकाळी गंगा गोदावरी मंदिरात महाअभिषेक करण्याबरोबरच यजुर्वेद संहिता पारायण केले जात होते.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा
रामकुंड येथे श्री गंगा गोदावरी पंचकोटी पुरोहित संघाच्या वतीने दरवर्षी माघ महिन्यात गोदाजन्मोत्सव साजरा करण्यात येतो. भागवत कथेचा समारोप झाल्यानंतर गोदावरीची शेकडो वर्षांची परंपरा असलेली पुरोहित संघाच्या वतीने गोदावरीची महाआरती झाली. पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, प्रतीक शुक्ल, कार्याध्यक्ष चंद्रशेखर पंंचाक्षरी व पुरोहीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आज माघ शुक्लपक्ष दशमी गंगादशहरा गोदावरी प्रकट दिनानिमित्त त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी येथील उगमस्थानी कृतज्ञता दर्शन भाविकांनी घेतले. यावेळी लक्ष्मण सावजी, नंदकुमार देसाई, प्रदीप पाटील, सागर शेलार, नंदकुमार कासेलानी व ब्रह्मवृंद उपस्थित होते.