धुळे dhule । प्रतिनिधी
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या (North Maharashtra University) निकालात (result) मोठ्या प्रमाणात गोंधळ असून निकालातील त्रुटी दूर (error in result) करावी यासाठी अॅड. पंकज गोरे यांनी कुलगुरूंची (Vice-Chancellor) भेट घेवून चर्चा केली.
धुळे-दादर त्रि-साप्ताहिक विशेष रेल्वेला सुरवात
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या विविध परीक्षांचे निकाल नुकतेच जाहीर करण्यात आले. मात्र या निकालात मोठ्या प्रमाणावर त्रुटी आढळून आल्या असून विद्यार्थ्यांना अत्यंत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्यांमधून नाराजीचा सूर उमटत होता, याबाबत विद्यार्थ्यांनी अॅड. पंकज गोरे यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली.
बाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी शासन तत्पर : पालकमंत्री गिरीश महाजन…. तर जळगाव शहर पुन्हा खड्ड्यात जाणार?
विद्यार्थ्यांच्या तक्रारींची दखल घेवून पंकज गोरे यांनी सिनेट सदस्य विष्णू भंगाळे यांच्यासोबत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू माहेश्वरी यांची भेट घेऊन निकालाबाबत चर्चा केली.
विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली तसेच पुढील परीक्षा झाल्यानंतर परीक्षांचे निकाल जाहीर करतांना संबंधित विद्यार्थ्याला संबंधित विषयांची उत्तरतालिका सोबत देण्याची देखील मागणी केली. त्यानंतर याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्वासन कुलगुरूंनी दिले.
धुळे बाजार समितीवर आ.कुणाल पाटील यांचे वर्चस्व