Wednesday, January 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजCongress: काँग्रेसने निवडणुकीत घेतली आघाडी; ४० स्टार प्रचारकांची यादी केली प्रसिध्द, या...

Congress: काँग्रेसने निवडणुकीत घेतली आघाडी; ४० स्टार प्रचारकांची यादी केली प्रसिध्द, या प्रचारकांचा आहे समावेश

मुंबई | Mumbai
राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका संपून निकाल लागल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांनी आपला मोर्चा महापालिका निवडणुकीकडे वळवला आहे. राज्यातील २९ महानगरापालिकांच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कबंर कसली आहे. निवडणुकांच्या या रणसंग्रामत उद्या बुधवारी शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या युतीची घोषणा होणार असल्याचे खासदार संजय राऊत यांनी जाहीर केले आहे. तर काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे. असे असतानाच काँग्रेसची प्रकाश आंबेडकरांशी होणारी आघाडी, यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

काँग्रेस पक्षाने इच्छुकांच्या मुलाखती संपवल्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीशी आघाडी करणार का याची तयारी केली आहे. आढावा बैठका आणि रणनितीवर सविस्तर चर्चा केल्यानंतर आता ४० स्टार प्रचारकांची यादी काँग्रेसने जाहीर केली आहे. या यादीत अनेक मोठ्या नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. या यादीत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यापासून ते तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यापर्यंत अनेक नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय, राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट, अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्यसभा खासदार इम्रान प्रतापगढी, ज्येष्ठ अभिनेते राज बब्बर यांचाही समावेश करण्यात आला आहे.

- Advertisement -

कोणा कोणाचा समावेश आहे यादीत?
विधिमंडळ पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार, खासदार छत्रपती शाहू महाराज, विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील, राष्ट्रीय सरचिटणीस मुकुल वासनीक, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस कार्य समितीचे सदस्य बाळासाहेब थोरात, तेलंगणाचे मंत्री मोहम्मद अझरुद्दीन, खासदार रजनीताई पाटील या सर्वांचा समावेश आहे.

YouTube video player

त्याचसोबत, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरे, अखिल भारतीय कार्य समितीचे सदस्य नसीम खान, अखिल भारतीय कार्य समितीच्या सदस्या यशोमती ठाकूर, खासदार प्रणिती शिंदे, आमदार अमिन पटेल, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, माजी मंत्री सुनिल केदार, आमदार अमित देशमुख, आमदार विश्वजित कदम, आमदार भाई जगताप अनिस अहमद, माजी मंत्री रमेश बागवे, माजी खा. हुसेन दलवाई, आ. साजिद खान पठाण, कन्हैया कुमार, आमदार जिग्नेश मेवाणी, माजी मंत्री वसंत पुरके, माजी आ. मुजफ्फर हुसेन, एम.एम. शेख, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष वजाहत मिर्झा, वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे व हनुमंत पवार यांचा या यादीत समावेश आहे.हे देखील आपल्या उमेदवारांसाठी प्रचार करणार आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Malegaon MC Election : उमेदवारांच्या मांदियाळीने निवडणुकीत चुरस; स्वपक्षीय बंडखोर-अपक्षांमुळे यशासाठी...

0
मालेगाव | हेमंत शुक्ला | Nashik शहरातील राजकीय प्रभुत्व सिध्द करण्यासाठी महानगरपालिका (Mahapalika Election) सभागृहात प्रवेशासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या नेते पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीच्या रणसंग्रामात पुन्हा उडी...