मुंबई । Mumbai
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज (शनिवार) महाराष्ट्रातील काँग्रेस विधिमंडळ पक्ष पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहे. काँग्रेस सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांनी काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या नावे जारी केलेल्या परिपत्रकामध्ये महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांची घोषणा केली आहे.
या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या आदेशानुसार, सतेज उर्फ बंटी पाटील यांची विधान परिषदेतील गटनेतेपदी, तर आमदार अमित देशमुख यांची विधानसभेतील पक्षाच्या मुख्य प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय अमीन पटेल यांची विधानसभेतील उपनेतेपदी, विश्वजीत कदम यांची सचिवपदी, शिरीषकुमार नाईक यांची प्रतोदपदी व संजय मेश्राम यांची प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
दुसरीकडे, विधान परिषदेतील मुख्य प्रतोदपदी अभिजीत वंजारी व प्रतोदपदी राजेश राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीत काँग्रेस पक्षाने वरिष्ट नेत्यांना डावलून नवीन आणि युवा चेहरांना संधी दिली आहे. विधिमंडळ कामकाजात वरिष्ट आमदारवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी नवीन चेहऱ्यांना दिली आहे.