Wednesday, January 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजराहुल गांधी होणार लोकसभेचे विरोधी पक्षनेते? कॉंग्रेसच्या बैठकीत ठराव मंजूर

राहुल गांधी होणार लोकसभेचे विरोधी पक्षनेते? कॉंग्रेसच्या बैठकीत ठराव मंजूर

नवी दिल्ली | New Delhi

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजपप्रणित एनडीए आघाडीला २९२ जागांसह बहुमत मिळाले आहे. त्यामुळे देशातील राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे. यानंतर आता नरेंद्र मोदी हे उद्या म्हणजेच रविवार (दि.०९) रोजी सायंकाळी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्याआधी आज शनिवार (दि.०८) रोजी दिल्लीत काँग्रेस कार्यकारिणी आणि पक्षाच्या संसदीय समितीची बैठक पार पडली.

- Advertisement -

या बैठकीत राहुल गांधी यांना विरोधी पक्षनेते करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती पक्ष संघटनेचे प्रभारी सरचिटणीस केसी वेणूगोपाल (KC Venugopal) यांनी दिली आहे. ते म्हणाले की, “काँग्रेस पक्षाचे आता पुनरुज्जीवन सुरू झाले आहे. पक्ष हा कॉंग्रेस वर्किंग कमिटीचा आत्मा आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकारिणीने एकमताने राहुल गांधींना लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद स्वीकारण्याची विनंती केली आहे. संसदेत या मोहिमेचे नेतृत्व करण्यासाठी राहुल गांधी हे सर्वात योग्य व्यक्ती आहेत, असे केसी वेणूगोपाल यांनी सांगितले.

YouTube video player

दरम्यान, काँग्रेस कार्यकारिणीने राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासमोर ठेवलेल्या प्रस्तावावर “राहुल गांधी यांनी आपण विचार करू”, असे म्हटल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राहुल गांधी विरोधी पक्षनेतेपद स्वीकारणार का? हे त्यांच्या होकारानंतरच स्पष्ट होणार आहे. जर असे झाल्यास राहुल गांधी हे १८ व्या लोकसभेत देशाच्या संसदेत (Parliament) विरोधी पक्षनेते पदासारखे महत्वाचे पद भूषवितांना दिसतील.

नरेंद्र मोदी घेणार तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ

लोकसभा निवडणूक २०२४ च्या विजयानंतर, एनडीए संसदीय पक्षाचे नेते नरेंद्र मोदी (Narendra Modi) रविवार सायंकाळी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी त्यांना सरकार स्थापनेसाठी आमंत्रित केले आहे. या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने २९३ जागा जिंकल्या आहेत. यात एकट्या भाजपच्या २४० जागा आहेत. या शपथविधीसाठी बांगलादेश, श्रीलंका, मालदीव, भूतान, नेपाळ, मॉरीशस आणि सेशेल्सचे प्रमुख नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.

ताज्या बातम्या

पडसाद : कांदा उत्पादकांची परवड सुरुच !

0
शेतकर्‍यांविषयी सर्वच राजकीय पक्षांना पुळका येत असतो, यात आता तसे काही नाविन्य राहिलेले नाही. प्रत्येकजण आम्हीच कसे शेतकरी हितकर्ते असा आव आणतात, हे देखील...