श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऋषिकेश दत्तात्रय सरोदे (वय 26, रा.पटेल हायस्कूल शेजारी, श्रीरामपूर) या तरुणाने शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की, दि. 27 नोव्हेंबर रोजी 11 वाजेच्या सुमारास माझ्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ अपलोड झाला. त्यामध्ये सचिन गुजर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा एकेरी भाषेत उल्लेख करुन त्यांचा अवमान केला आहे.
यामुळे आमच्या भावना दुखावल्या आहेत. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात सचिन रंगराव गुजर यांच्यावर भारतीय न्याय संहीता 2023 चे कलम 353(2) नुसार अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करत आहे.




