Tuesday, January 6, 2026
Homeनगरश्रीरामपूर नगरपरिषदेवर काँग्रेस-महाआघाडीचे वर्चस्व; करण ससाणे नगराध्यक्षपदी, तर अनुराधा आदिक यांना मोठा...

श्रीरामपूर नगरपरिषदेवर काँग्रेस-महाआघाडीचे वर्चस्व; करण ससाणे नगराध्यक्षपदी, तर अनुराधा आदिक यांना मोठा धक्का

श्रीरामपूर । प्रतिनिधी

श्रीरामपूर नगरपालिकेच्या चूरशीच्या झालेल्या तिरंगी लढतीत काँग्रेसने नगराध्यक्ष पदासह 20 नगरसेवक पदाच्या जागेवर विजय संपादन करत एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे. तर त्यापाठोपाठ भाजपा 10, शिंदे सेना 3 तर अपक्ष असे उमेदवार विजयी झाले आहेत. काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार करण जयंत ससाणे यांना 24 हजार 724 मते मिळाली असून त्यांनी भाजपा-राष्ट्रवादी युतीचे उमेदवार श्रीनिवास बिहाणी यांचा 6767 मतांनी पराभव केला. तर शिंदे सेनेचे प्रकाश चित्ते यांना तिसर्‍या क्रमांकावर समाधान मानावे लागले. श्री. बिहाणी यांना 17 हजार 957 तर श्री.चित्ते यांना 8086 मते मिळाली आहेत.

- Advertisement -

नवीन प्रशासकीय इमारतीत प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी किरण सावंत पाटील, सहाय्यक निवडणूक अधिकारी तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मच्छिंद्र घोलप यांच्या उपस्थितीत मतमोजणीला सकाळी 10 वाजता प्रारंभ झाला. पहिल्या फेरीपासून करण ससाणे हे आघाडीवर होते. 17 टेबलांवर फेर्‍यांचे आकडे असल्याने सुरूवातीला आकडे समजायला काही गोंधळ उडाला. परंतु, जसजशे आकडे पुढे येवू लागले तसतसे काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर मतमोजणी केंद्राबाहेर जमले. करण ससाणे यांनी 4 थ्या फेरीनंतर निर्णायक आघाडी घेतल्यावर सकाळी 11.15 नंतर कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून, फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करायला सुरूवात केली. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत ससाणे हे विजयी झाल्यानंतर शहरातून त्यांची भव्य विजयी मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर नगरपालिकेसमोर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी, जल्लोश केला. महिला कार्यकर्त्यांनी फुगड्या खेळून, गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला. सन 2016 च्या पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला नगराध्यक्षपदासह नगरसेवक पदाच्या 11 जागा मिळाल्या होत्या. मात्र या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा सुपडासाफ झाला. त्यात नगरसेवक पदाची निवडणूक लढवत असलेल्या माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान वैशाली चव्हाण आणि दिपक चव्हाण हे पती-पत्नी विजयी झाले आहेत तर विजया प्रभाकर गाडेकर व रुपाली सागर भागवत या मायलेकी पराभूत झाल्या.

YouTube video player

विजयी व पराभूत उमेदवार पुढीलप्रमाणे-
प्रभाग 1 (अ) मध्ये दिपक वसंतराव वमने (1657, विजयी, काँग्रेस), पराभूत- प्रशांत देविदास कहाणे (634, शिंदे सेना), वसंत विठ्ठल कोल्हे (21, अपक्ष), बाळासाहेब अनंतराव गाडेकर (55, शिवसेना उबाठा), शंकर आसाराम चव्हाण (682, भाजप).
प्रभाग 1 (ब)- सोनिया चरणजितसिंग उर्फ बिट्टू कक्कड (1652, विजयी, काँग्रेस), पराभूत- अंजु प्रशांत अलघ (656, भाजप), शकुंतला अशोक कोल्हे (51, अपक्ष), दिपाली गणेश खैरनार (558, शिंदे सेना), हसिना हनीफ शेख (142, शिवसेना उबाठा),.
प्रभाग 2 अ- प्रणिती दिपक चव्हाण (1207, काँग्रेस), पराभूत- पुष्पा मनोज चव्हाण (368, अपक्ष), भूमिका आशिष बागुल (85, शिवसेना उबाठा), अंजना कचरू शेळके (324, अपक्ष), जयश्री विजय शेळके (478, राष्ट्रवादी), रेखा सूर्यभान शेळके (738, शिंदे सेना).
प्रभाग 2 ब- अर्जुन खुशाल दाभाडे (1630, अपक्ष), पराभूत- राजेश हरिराम अलघ (421, भाजपा), सागर बाळासाहेब कुदळे (47, अपक्ष), मल्लू मारुती शिंदे (510, शिंदे सेना), रोहित शामलिंग शिंदे (585, काँग्रेस), इम्रान सत्तार शेख (18, समाजवादी पार्टी), रफिक शौकत शेख 28, बसपा).
प्रभाग 3 अ- नागेश्वरी भाऊसाहेब उर्फ रितेश एडके (944, काँग्रेस), पराभूत- डायना अशोक आडांगळे (118, शिवसेना उबाठा), अनिता प्रकाश ढोकणे (636, राष्ट्रवादी), माधुरी रमेश शिनगारे (169, अपक्ष), सोनाली विशाल शिरसाठ (258, शिंदे सेना), प्राजक्ता महेंद्र त्रिभुवन (75, अपक्ष).
प्रभाग 3 ब- कांचन दिलीप सानप (1232, काँग्रेस), पराभूत- अनुराधा गोविंदराव आदिक (812, राष्ट्रवादी), प्रशांत उत्तम चित्ते (264, शिंदे सेना), विकास देविदास नरोडे (156, बसपा), जुबेर अशपाक शेख (191, उबाठा), मुक्तार यूनुस शेख (50, अपक्ष), अ‍ॅड. सोनाली चरण त्रिभुवन (33, अपक्ष).
प्रभाग 4 अ- दिलीप एकनाथ नागरे (1972, काँग्रेस), पराभूत- अनिल बन्सी डहाळे (329, अपक्ष), रियाज गफ्फार पोपटीया (780, राष्ट्रवादी), सुहास रमेश माणिकजडे (336, शिंदे सेना).
प्रभाग 4 ब- नवनितर्कौर हरदीपसिंग लकी सेठी (1500, काँग्रेस), पराभूत- प्रिया रवींद्र गरेला (178, शिंदे सेना), हेमा रविंद्र गुलाटी (1430, भाजपा), दिपाली पारसकुमार माटा (81, अपक्ष), नसीमबी चांद शेख (265, शिवसेना उबाठा).
प्रभाग 5 अ- जाकिया सादिक शेख (1903, काँग्रेस), पराभूत- उज्ज्वला दिलीप दिवटे (85, शिंदे सेना), अंजुम ताहिर बागवान (702, राष्ट्रवादी), जुबेदा फाजल शाह (34, बसपा).
प्रभाग 5 ब- मुजफ्फर पापाभाई शेख (1847, काँग्रेस), पराभूत- चेतन जगन्नाथ दिवटे (78, शिंदे सेना), साजिद अबारा मिर्झा (364, राष्ट्रवादी), शेख जोएफ युनूस जमादार (436, समाजवादी पार्टी),
प्रभाग 6 अ- राजेंद्र जगन्नाथ पवार (2144, काँग्रेस), पराभूत-सोमनाथ सखाराम गांगुर्डे (318, शिंदे सेना), मुक्तार मुसा मन्यार (766, राष्ट्रवादी).
प्रभाग 6 ब- शाहेला शहारोज शहा (2281, काँग्रेस), पराभूत- सुनीता भागुजी मेने (383, शिंदे सेना), यास्मिन इरफान शेख (503, राष्ट्रवादी).
प्रभाग 7 अ- शाम अर्जुन आढागळे (1559, काँग्रेस), पराभूत- शाम शंकर कानडे (20, अपक्ष), रविंद्र भानुदास जावळे (149, शिवसेना उबाठा), रोहित सोमनाथ फाजगे (47, अपक्ष), मनोज संजय बागुल (1039, शिंदे सेना), सचिन ताराचंद रणदिवे (823, राष्ट्रवादी).
प्रभाग 7 ब- यास्मिन जजावेद शेख (1352, काँग्रेस), पराभूत- रेश्मा फिरोज पठाण (69, बसपा), भारत लोखंडे सविता (896, शिंदे सेना), रुकसाना शब्बीर शेख (1288, राष्ट्रवादी).
प्रभाग 8 अ- जायदाबी कलीम कुरेशी (2985, काँग्रेस), पराभूत- सफीयाबानो नजीर मुलाणी (1229, राष्ट्रवादी).
प्रभाग 8 ब- रईस अब्दुल गणी (1741, काँग्रेस), पराभूत- अक्षय राजू काळे (124, शिंदे सेना), शाहरुख इस्माईल कुरेशी (1403, अपक्ष), मुख्तार ताहेर शाह (964, राष्ट्रवादी).
प्रभाग 9 अ- सिध्दार्थ संजय फंड (1278, भाजपा), पराभूत- विराज अनिल आंबेकर (559, शिंदे सेना), सिद्धार्थ योगेश उर्फ राजेंद्र सोनवणे (1213, काँग्रेस).
प्रभाग 9 ब- निलोफर महंमद शेख (1164, काँग्रेस), पराभूत- उन्नती अतुल उपाध्ये (640, शिंदे सेना), साक्षी संजय जाधव (110, अपक्ष), सोनाली रुपेश हरकल (1115, भाजपा).
प्रभाग 10अ- वैशाली सुभाष पोटे (1137, काँग्रेस), पराभूत- चारुशीला तिलकचंद डुंगरवाल (1097, भाजपा), सुवर्णा आशिष मोरे (65, शिवसेना उबाठा), मीना दीपक हिवराळे (527, शिंदे सेना).
प्रभाग 10 ब- संदेश जनार्दन गांगड (1186, भाजपा), पराभूत- पोपट सखाराम खरात (57, अपक्ष), रविंद्र अशोक खिलारी (956, काँग्रेस), विशाल अशोकराव जाधव (444, शिंदे सेना), आशिष अर्जुन मोरे (44, शिवसेना उबाठा), सचिन कृष्णा वायकर (128, अपक्ष).
प्रभाग 11 अ- मंजुश्री सिध्दार्थ मुरकुटे (1095, शिंदे सेना), पराभूत- जयश्री अर्जुन करपे (1084, भाजपा), जयश्री प्रविण कोठावळे (691, काँग्रेस), प्रतिभाताई राधेश शिंदे (91, अपक्ष).
प्रभाग 11 ब- आशिष विजयकुमार धनवटे (1714, भाजप), पराभूत- प्रसाद बाळासाहेब चौधरी (863, काँग्रेस), रविंद्र बारकु जाधव (394, शिंदे सेना).
प्रभाग 12 अ- आकाश अशोक बेग (1334, शिंदे सेना), पराभूत- व्यंकटेश मोहन आढांगळे (833, भाजपा), भाग्येश शामलाल लोखंडे (779, काँग्रेस).
प्रभाग 12 ब- जयश्री रवी पाटील (1274, भाजपा), पराभूत- मनिषा रंजन गोराणे (1029, शिंदे सेना), पूनम सचिन उर्फ गुड्डू यादव (656, काँग्रेस).
प्रभाग 13 अ- वैशाली दिपक चव्हाण (1028, भाजपा), पराभूत- स्वाती विजय काळे (387, शिंदे सेना), रागेश्वरी सुनील मोरे (532, काँग्रेस).
प्रभाग 13 ब- दिपक बाळासाहेब चव्हाण (1519, भाजपा), पराभूत- सागर दिपक कुर्‍हाडे (816, काँग्रेस), रमेश रंगनाथ डुकरे (182, शिंदे सेना), भरत जयसिंग शेळके (271, अपक्ष).
प्रभाग 14 अ- अ‍ॅड. संतोष भाऊसाहेब कांबळे (742, शिंदे सेना), पराभूत- अमित मधुकर गायकवाड (693, अपक्ष), शुभांगी अतुल शेटे (693, काँग्रेस), सतीश कुंडलिक सौदागर (713, भाजपा).
प्रभाग 14 ब- आशा संतोष परदेशी (768, काँग्रेस), पराभूत- विजया प्रभाकर गाडेकर (710, भाजपा), प्रियंका गणेश भिसे (621, शिंदे सेना), सोना महेश विश्वकर्मा (22, अपक्ष), सायरा सलीम शेख (726, उबाठा).
प्रभाग 15 अ- योगिता निलेश नागले (1024, काँग्रेस), पराभूत- सीमा निलेश भालेराव (17, अपक्ष), जयश्री मनोज भिसे (504, शिंदे सेना), दिपाली गणेश मोरगे (877, अपक्ष), पुष्पलता देवराम हरदास (495, भाजपा).
प्रभाग 15 ब- योगेश लक्ष्मणराव जाधव (1338, काँग्रेस), पराभूत- प्रकाश सुखदेव आहिरे (58, अपक्ष), संजय जगन्नाथ छल्लारे (1277, भाजपा), निलेश भागाजी भालेराव (40, अपक्ष), किरण सुरेश सोनवणे (179, शिंदे सेना).
प्रभाग 16 अ- आशा शशांक रासकर (1859, भाजपा), पराभूत- श्रद्धा मनीष काळे (74 अपक्ष), सुनीता बाबासाहेब खोसरे (31, अपक्ष), शिल्पा संतोष गायकवाड (37, शिवसेना उबाठा), स्वाती प्रवीण बोंबले (1154, काँग्रेस), सारिका राजेश वाव्हळ (185, शिंदे सेना).
प्रभाग 16 ब- जितेंद्र सुभाष छाजेड (1678, भाजपा), पराभूत- किशोर तुकाराम गंगावणे (19, अपक्ष), स्वप्निल अनिल चोरडिया (846, काँग्रेस), सुभाष राजाराम जंगले (141, शिंदे सेना), निलेश भागाजी भालेराव (77, अपक्ष), सिमा नितीन हारदे (585, अपक्ष).
प्रभाग 17 अ- स्नेहल केतन खोरे (1631, भाजपा), पराभूत- हर्षदा सुरेश कांगुणे (250, शिंदे सेना), रुपाली सागर भागवत (1461, काँग्रेस).
प्रभाग 17 ब- मनोज दादासाहेब लबड़े (1971, भाजपा), पराभूत- अभिजीत चंद्रकांत लिप्टे (1350, काँग्रेस).

हे आहेत नूतन नगरसेवक
प्रभाग 1 अ- दिपक वसंतराव वमने (काँग्रेस)
प्रभाग 1 ब-सोनिया चरणजितसिंग उर्फ बिट्टू कक्कड (काँग्रेस)
प्रभाग 2 अ- प्रणिती दिपक चव्हाण (काँग्रेस)
प्रभाग 2 ब- अर्जुन खुशाल दाभाडे (अपक्ष)
प्रभाग 3 अ- नागेश्वरी भाऊसाहेब उर्फ रितेश एडके (काँग्रेस)
प्रभाग 3 ब- कांचन दिलीप सानप (काँग्रेस)
प्रभाग 4 अ- दिलीप एकनाथ नागरे (काँग्रेस)
प्रभाग 4 ब- नवनितकौर हरदीपसिंग लकी सेठी (काँग्रेस)
प्रभाग 5 अ- जाकिया सादिक शेख (काँग्रेस)
प्रभाग 5 ब- मुजफ्फर पापाभाई शेख (काँग्रेस)
प्रभाग 6 अ- राजेंद्र जगन्नाथ पवार (काँग्रेस)
प्रभाग 6 ब- शाहेला शहारोज शहा (काँग्रेस)
प्रभाग 7अ- शाम अर्जुन आढागळे (काँग्रेस)
प्रभाग 7 ब- यास्मिन जावेद शेख (काँग्रेस)
प्रभाग 8अ- जायदाबी कलीम कुरेशी (काँग्रेस)
प्रभाग 8ब- रईस अब्दुल गणी (काँग्रेस)
प्रभाग 9अ- सिध्दार्थ संजय फंड (भाजपा)
प्रभाग 9 ब- निलोफर महंमद शेख (काँग्रेस)
प्रभाग 10अ- वैशाली सुभाष पोटे (काँग्रेस)
प्रभाग 10 ब- संदेश उर्फ संजय जनार्दन गांगड (भाजपा)
प्रभाग 11अ- मंजुश्री सिध्दार्थ मुरकुटे (शिंदे सेना)
प्रभाग 11 ब- आशिष विजयकुमार धनवटे (भाजप)
प्रभाग 12 अ- आकाश अशोक बेग (शिंदे सेना)
प्रभाग 12 ब- जयश्री रवी पाटील (भाजपा)
प्रभाग 13 अ- वैशाली दिपक चव्हाण (भाजपा)
प्रभाग 13 ब- दिपक बाळासाहेब चव्हाण (भाजपा)
प्रभाग 14 अ- अ‍ॅड. संतोष भाऊसाहेब कांबळे (शिंदे सेना)
प्रभाग 14 ब- आशा संतोष परदेशी (काँग्रेस)
प्रभाग 15 अ- योगिता निलेश नागले (काँग्रेस)
प्रभाग 15 ब- योगेश लक्ष्मणराव जाधव (काँग्रेस)
प्रभाग 16 अ- आशा शशांक रासकर (भाजपा)
प्रभाग 16 ब- जितेंद्र सुभाष छाजेड (भाजपा)
प्रभाग 17 अ- स्नेहल केतन खोरे (भाजपा)
प्रभाग 17 ब- मनोज दादासाहेब लबड़े (भाजपा),

35 वर्षांत येथे कधीही जातीयवादी शक्तींना थारा मिळालेला नाही. येथील जनता ही स्वाभिमानी असून सदैव विकासाच्या पाठीशी असल्याचे या निकालाने दाखवून दिले आहे.
– आ. हेमंत ओगले

श्रीरामपूरच्या नागरिकांनी कोणत्याही दडपशाहीला आणि प्रलोभनांना बळी न पडता सजग, स्वाभिमानी असल्याचे दाखवून दिले. मतदारांनी माजी आमदार स्व. जयंत ससाणे यांच्या विचारांवर विश्वास ठेवून काँग्रेसला मतदान केले. श्रीरामपूरला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहे.
– करण ससाणे, नवविर्वाचित नगराध्यक्ष

जनतेने दिलेला कौल नम्रपणे स्वीकारत आहे. आणि पुढील काळातही जनतेची सेवा करणार आहे. जिंकलेल्या उमेदवारांना माझ्या शुभेच्छा. शहराच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे.
– श्रीनिवास बिहाणी, भाजपा नगराध्यक्षपदाचे उमेदवार

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ठाम पाठबळ व शिवसेनेच्या धनुष्यासह मी ही निवडणूक एकट्याच्या बळावर लढवली. स्थानिक मंत्री, नामदार, आमदार व धनशक्ती कुणीही माझ्यासोबत नव्हते. मला पडलेली मते ही निव्वळ शिवसेनेची व माझ्या सारख्या छोट्या कार्यकर्त्याच्या कामाची मते आहेत. काँग्रेसचा विजय हा काँग्रेसच्या पारंपारिक मतांचा विजय आहे. जनतेने दिलेला कौल हा मला मान्य आहे.
– प्रकाश चित्ते, शिंदे सेना नगराध्यक्षपदाचे उमेदवार

काँग्रेसचे माजी उपनगराध्यक्ष अंजुम शेख व मुजफ्फर शेख यांनी रेल्वेच्या पलीकडे काँग्रेसमध्ये एकजूट ठेवली. त्याठिकाणी त्यांनी काँग्रेसच्या 16 पैकी 15 जागा निवडून आणण्यात सिंहाचा वाट उचलला आहे.

पक्षीय बलाबल
(एकुण जागा34)
काँग्रेस- 20
भाजपा- 10
शिंदे सेना 03
अपक्ष-01

ताज्या बातम्या

Nashik News : कट चहा ५, कॉफी १२ तर मिसळपाव ‘इतक्या’...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik नाशिक महापालिका सार्वत्रिक निवडणूक (Nashik Municipal Corporation) २०२६ च्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या निवडणूक खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने स्थानिक प्रचलित दरांची यादी...