Saturday, November 23, 2024
Homeमहाराष्ट्रकाँग्रेसचे निष्ठावंत आमदार पी. एन. पाटील यांचे निधन

काँग्रेसचे निष्ठावंत आमदार पी. एन. पाटील यांचे निधन

मुंबई | Mumbai

काँग्रेसचे (Congress) प्रदेश उपाध्यक्ष आणि करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पी. एन. पाटील (MLA P.N Patil) यांचे वयाच्या ७१ व्या वर्षी निधन (Passed Away) झाले आहे. पहाटेच्या सुमारास खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. पाटील यांची गांधी घराण्याचे विश्वासू आणि दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचे खंदे समर्थक म्हणून ओळख होती.

- Advertisement -

पाटील हे रविवारी राहत्या घरातील बाथरुममध्ये पाय घसरुन पडले होते. त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. यानंतर त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार (Treatment) सुरु होते. मात्र उपचार सुरु असतानाच त्यांचे निधन झाले. पी.एन. पाटील यांची नेहमीच आपल्या वैचारिक भूमिकेला कुठेही ठेच आणि डाग न लावता राजकारण करणारा आमदार म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात ओळख होती. अलीकडेच ईडीचा (ED) वापर करून आमदारांवर दबाव टाकण्याचे प्रयत्न सुरु असताना पाटील स्वतः ईडी कार्यालयात हजर राहून चौकशीला सामोरे गेले होते. यानंतर आज त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले.

काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर १९९९ साली आमदार पी.एन. पाटील यांना जिल्हा काँग्रेस पदाची जबाबदारी मिळाली होती. तेंव्हापासून ते आत्तापर्यंत पाटील यांनी कधीही खांद्यावरून तिरंगा उतरू दिला नाही. पाटील यांचे मूळगाव करवीर (Karveer) तालुक्यातील सडोली खालसा हे आहे. पूर्वीचा सांगरूळ विधानसभा मतदारसंघ आणि आताचा करवीर विधानसभा मतदारसंघात गावपातळीपर्यंत बांधलेली त्यांची कार्यकर्त्यांची फळी आजही तितकीच मजबूत आहे.

दरम्यान, पी.एन. पाटील हे पहिल्यांदा २००४ साली आमदार झाले होते. त्यानंतर २००९ आणि २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यांच्या या पराभवाला पक्षातीलच काही लोक जबाबदार असल्याचे बोलले जात होते. पंरतु, पी. एन. पाटील हे कोणी गद्दारी केली म्हणून त्याच्यावर कधीच द्वेष दाखवत नव्हते. यानंतर पाटील यांना कॉंग्रेसने २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा उमेदवारी दिली असता ते या निवडणुकीत मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या