Friday, November 22, 2024
Homeब्रेकिंग न्यूजविधानसभेच्या जागावाटपाच्या चर्चेसाठी प्रदेश काँग्रेसची समिती; 'या' नेत्यांचा समावेश

विधानसभेच्या जागावाटपाच्या चर्चेसाठी प्रदेश काँग्रेसची समिती; ‘या’ नेत्यांचा समावेश

मुंबई | प्रतिनिधी | Mumbai

येत्या ऑक्टोबर महिन्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या अंतर्गत जागावाटपाची चर्चा करण्यासाठी काँग्रेसच्या वतीने राज्य पातळीवरील समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीत प्रदेश काँग्रेसच्या सात तर मुंबई काँग्रेसच्या तीन अशा एकूण दहा १० सदस्यांचा समावेश आहे. काँग्रेसने शुक्रवारी नवी दिल्लीतून या समितीची घोषणा केली.

- Advertisement -

या प्रदेश समितीत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, नसीम खान आणि सतेज पाटील यांचा समावेश आहे. तर मुंबईतील समितीत मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा प्रा. वर्षा गायकवाड, भाई जगताप आणि माजी मंत्री अस्लम शेख यांना स्थान देण्यात आले आहे. ही समिती राज्य पातळीवरील महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाशी विधानसभा मतदारसंघाच्या जागावाटपाविषयी वाटाघाटी करेल.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी जागावाटपाच्या चर्चेसंबंधी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी शरद पवार आणि काँग्रेस नेत्यांमध्ये बैठक पार पडली.या बैठकीत महाविकास आघाडीच्या जागावाटपावर प्राथमिक चर्चा झाली आहे. ज्या मतदारसंघात महाविकास आघाडीचे आमदार आहेत ती जागा सदर पक्षाला सोडली जावी, त्याव्यतिरिक्तचे जे मतदारसंघ आहेत तिथे स्थानिक परिस्थितीचा अंदाज घेऊन जागावाटप व्हावं, यावर पवार आणि काँग्रेस नेत्यांमध्ये एकमत झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता आगामी काळात मविआचे विधानसभेचे जागावाटपाचे कोडे कसे सुटते हे पाहणे महत्वाचे असणार आहे.  

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या