Tuesday, May 21, 2024
Homeमुख्य बातम्याआजपासून रायपूरमध्ये काँग्रेसचं महाअधिवेशन; पहिल्याच दिवशी सोनिया गांधी, राहुल आणि प्रियंका यांची...

आजपासून रायपूरमध्ये काँग्रेसचं महाअधिवेशन; पहिल्याच दिवशी सोनिया गांधी, राहुल आणि प्रियंका यांची दांडी

रायपूर | Raipur

आजपासून रायपूरमध्ये काँग्रेसचं अधिवेशन होणार आहे. या तीन दिवसांच्या अधिवेशनात आर्थिक, राजकीय, कृषी, अशा विविध मुद्यांवर चर्चा होणार आहे. हे तीन दिवसांचे राष्ट्रीय अधिवेशन असणार आहे.

- Advertisement -

मात्र, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी गांधी कुटुंबातील एकही सदस्य उपस्थित राहणार नाही. अशी माहिती समोर आली आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे पहिल्याच दिवशी दांडी मारणार आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी काँग्रेस नेत्यांच्या दोन बैठका होणार आहे. यामध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. उद्या (२५ फेब्रुवारी) आर्थिक, राजकीय, आंतरराष्ट्रीय विषयांचे प्रस्ताव मांडण्यात येणार आहेत.

तर २६ फेब्रुवारीला कृषी आणि किसान कल्याण, युवा रोजगार, शिक्षा आणि या विषयांवरील प्रस्ताव मांडण्यात येणार आहेत. २६ फेब्रुवारीला दुपारी २ वाजता काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मलिकाअर्जुन खर्गे यांचे भाषण होणार आहे. खर्गेंच्या भाषणाने अधिवेशनाची सांगता होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या