Wednesday, October 23, 2024
Homeदेश विदेशPriyanka Gandhi : प्रियांका गांधींचा वायनाडमधून उमेदवारी अर्ज दाखल; कॉंग्रेसकडून जोरदार शक्तीप्रदर्शन

Priyanka Gandhi : प्रियांका गांधींचा वायनाडमधून उमेदवारी अर्ज दाखल; कॉंग्रेसकडून जोरदार शक्तीप्रदर्शन

नवी दिल्ली वृतसंस्था | New Delhi
काँग्रेस सरचिटणीस प्रियाका गांधी यांनी रोड शोनंतर वायनाड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत भाऊ राहुल गांधी, आई सोनिया गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हेही उपस्थित होते.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीत रायबरेली आणि वायनाड अशा दोन लोकसभा मतदारसंघांमधून विजय मिळाल्यानंतर वायनाडमधील खासदारकीचा राजीनामा दिला होता. त्यामुळे या मतदारसंघातील जागा रिक्त झाली होती. तिथे काँग्रेसकडून प्रियंका गांधी यांना उमेदवारी घोषित करण्यात आली होती. दरम्यान, आज प्रियंका गांधी यांनी रोड शो च्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी सकाळी ११ वाजता कलपेट्टा न्यू बस स्टँड येथून रोड शो ला सुरुवात केली. या रोड शोनंतर प्रियंका गांधी यांनी सभेला संबोधित केले.

- Advertisement -

यावेळी प्रियांका गांधी म्हणाल्या, जे सत्तेत आहेत त्यांनी सत्तेत राहण्यासाठी द्वेषाचा वापर केला. त्यांनी विभक्तता निर्माण केली. हे आपले राष्ट्र ज्या राजकारणावर बांधले गेले ते नाही. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील आपली स्वातंत्र्य चळवळ प्रत्येक धर्माच्या समानतेने आणि आदराने प्रेरित होती. येशू ख्रिस्त आपल्याला नम्रतेबद्दल शिकवतो. बुद्धाची शिकवण आपल्याला अहिंसेचा मार्ग दाखवते. आज आपण राष्ट्रवादाच्या या मूल्यांसाठी लढत आहोत. आम्ही सत्य, न्याय आणि समतेसाठी लढत आहोत. या मूल्यांनी माझ्या भावाला भारतभर प्रेम आणि एकात्मतेसाठी चालण्याची प्रेरणा दिली.

प्रियंका यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधी म्हणाले की, मी अजूनही तुमचा खासदार आहे. राहुल गांधी यांनी 2024 ची सार्वत्रिक निवडणूक वायनाड आणि रायबरेलीमधून लढवली होती. दोन्ही जागांवर ते विजयी झाले होते. मात्र निकाल आल्यानंतर त्यांनी वायनाडमधून आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला होता.

राहुल गांधी म्हणाले, ”मला तुम्हाला आठवण करून द्यायची आहे की, वायनाड ही देशातील एकमेव जागा असेल जिथे दोन खासदार असतील. एक अधिकृत आणि एक अशासकीय. तुमचे दोन्ही खासदार तुमचे हित जपण्याचे काम करतील.”

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या