Friday, September 20, 2024
HomeराजकीयVijay Wadettiwar on Mahayuti : महायुती सरकारच्या नको 'त्या' उद्योगांमुळे आणखी एक...

Vijay Wadettiwar on Mahayuti : महायुती सरकारच्या नको ‘त्या’ उद्योगांमुळे आणखी एक प्रकल्प गुजरातकडे; वडेट्टीवारांची टीका

मुंबई | Mumbai

- Advertisement -

राज्यात महायुतीचे सरकार आल्यापासून महाराष्ट्रातील अनेक मोठमोठे प्रकल्प गुजरातला गेलेत. यावरून विरोधक नेहमीच सत्ताधार्यांना घेरण्याचा प्रयत्न करत असतात.

वेदांता फॉक्सकॉन, टाटा-एअरबस विमान प्रकल्प आधीच गुजरातला गेल्यानंतर आता विदर्भात उभारण्यात येणारा सोलर पॅनल प्रकल्प (Solar Panel Project) गुजरातला गेल्याची माहिती समोर येत आहे. काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी याबाबत ट्विट करत राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. ‘महायुती सरकारच्या उदासीनतेमुळे महाराष्ट्रात येणार आणखी एक प्रकल्प गुजरातमध्ये गेला,’ अशी टीका त्यांनी यावेळी केली आहे.

“महायुती सरकारच्या नको त्या उद्योगांमुळे राज्यातील आणखी एक उद्योग गुजरातकडे गेला. नागपूरमध्ये सोलर पॅनल प्रकल्प येणार होता. या प्रकल्पाअंतर्गत 18 हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येणार होती. राजकीय आणि प्रशासकीय उदासीनतेमुळे हे प्रकल्प राज्याबाहेर गेल्याची माहिती पुढे आली आहे. आधी वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प, टाटा-एअरबस विमान प्रकल्प आणि आता सोलर पॅनल प्रकल्प हे सगळे गुजरातच्या झोळीत पडले आहेत.” अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

ते पुढे म्हणाले की, “हिंदू-मुस्लिम, जीभ कापा-जीभेला चटके द्या, पक्ष फोडा-आमदार पळवा, सतत असे निरर्थक उद्योग करणारे महायुती सरकार महाराष्ट्रात आहे. त्यामुळे जगभरातील कॉर्पोरेट कंपन्या आणि उद्योगांना राज्यात उद्योग करणे कठीण झाले आहे. तर दुसरीकडे अधिकारी हे मंत्र्यांना खुश करण्यात व्यस्त आहे.” असा टोला त्यांनी यावेळी लगावला आहे. “मंत्र्यांची मस्ती, आमदारांचे नको ते लाड यामुळे महाराष्ट्राची पिछेहाट होत असून राज्यातील तरुणांचे रोजगार हिरावले जात आहेत.” असा आरोप त्यांनी महायुती सरकारवर केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या