मुंबई | Mumbai
नुकतेच काही दिवसांपूर्वी झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत (Vidhan Parishad Election) काँग्रेसच्या काही आमदारांनी (MLA) क्रॉस व्होटिंग केले होते. त्यामुळे काँग्रेसची (Congress) चांगलीच अडचण झाली होती. मात्र, पक्षाशी दगाफटका करणाऱ्या आमदारांवर कडक कारवाई केली जाईल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी म्हटले होते. त्यानंतर आता विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग करणाऱ्या काँग्रेसच्या पाच आमदारांचा आगामी विधानसभा निवडणुकीत पत्ता कट होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
हे देखील वाचा : तारीख पे तारीख! शिवसेना, राष्ट्रवादी आमदार अपात्रतेची सुनावणी पुढे ढकलली
मिळालेल्या माहितीनुसार, विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारांना आगामी विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) तिकीट न देण्याच्या सूचना थेट काँग्रेस हायकमांडकडून राज्य पातळीवरील नेत्यांना देण्यात आल्याचे समजते. या पाच आमदारांच्या मतदारसंघात नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचे काँग्रेस हायकमांडने प्रदेशाध्यक्षांना आदेश दिल्याचे बोलले जात आहे.
हे देखील वाचा : Nashik News : विधानसभेसाठी मतदारांमध्ये १ लाख ३० हजारांनी वाढ; निवडणुक तयारीला वेग
दरम्यान, विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या ज्या आमदारांनी क्रॉस व्होटिंग (Cross Voting) केल्याचा संशय आहे. त्यामध्ये इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर, देगलूरचे जितेश अंतापूरकर, अमरावतीच्या सुलभा खोडके, वांद्रे पूर्वचे झिशान सिद्दिकी आणि नांदेड दक्षिणचे मोहन हंबर्डे यांचा नावाचा समावेश असल्याचे समजते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत या आमदारांचे खरच तिकीट कापले जाणार का? किंवा त्यांच्या जागी कुणाला संधी मिळते? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
हे देखील वाचा : Paris Olympic 2024 : ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्राची कमाल; पहिल्याच थ्रोमध्ये अंतिम फेरीत धडक
विधानपरिषद निवडणुकीत नेमकं काय झालं होतं?
विधानपरिषद निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर विजयी झाले. मात्र या निवडणुकीआधी महाविकास आघाडीत मोठे राजकीय नाट्य घडले होते. शिवसेना ठाकरे गटाकडे आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी केवळ १६ आमदारांची मते होती.त्यामुळे त्यांना विजयासाठी २३ मतांची आवश्यकता होती. त्यांना उर्वरित ७ मतांसाठी काँग्रेसच्या अतिरिक्त मतांची गरज होती. हि मते पदरात पाडून घेण्यासाठी ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये मोठा वाद झाल्याची चर्चा आहे. मिलिंद नार्वेकरांना मते द्यायची की, शेकापच्या जयंत पाटलांना? यावरून काँग्रेसमध्ये दोन गट पडले होते. यात पृथ्वीराज चव्हाण, सतेज पाटील, नसीम खान, नाना पटोलेंनी ठाकरेंच्या बाजूने कौल दिला तर विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब थोरात जयंत पाटलांना मतं देण्याच्या बाजूनं होते. ज्या ८ आमदारांचा कोटा काँग्रेसने ठरवून दिला त्या आमदारांवर ठाकरेंचा विश्वास नव्हता. ते आमदार क्रॉस व्होटिंग करतील आणि नार्वेकरांना दगाफटका होईल, अशी भीती ठाकरेंना वाटत होती. त्यानंतर विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या काही आमदारांनी क्रॉस व्होटिंग केले. त्यामुळे जयंत पाटील हे महाविकास आघाडीचे तिसरे उमेदवार पराभूत झाले आणि ठाकरे गटाच्या मिलिंद नार्वेकर यांचा विजय झाला. त्यामुळे काँग्रेसची जी मते फुटली त्यामध्ये वरील आमदारांवर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना संशय आहे.
हे देखील वाचा : Nashik Crime News : पोलिसांची अठरा मद्यपी चालकांवर कारवाई; परवाने निलंबित
जागावाटपाबाबत लवकरच मविआची महत्त्वाची बैठक
काँग्रेस नेते आणि देशाचे माजी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे मुंबईत येणार आहेत. यावेळी त्यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीतील नेत्यांसोबत बैठक होईल. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणूक आणि मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा होईल. याबाबत काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्निथला यांनी माहिती दिली आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा