अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
दरेवाडी (ता. नगर) येथील बांधकाम व्यवसायिक ज्ञानेश्वर सोनवणे यांनी मटेरियल सहित बांधकामासाठी घेतलेल्या जागेवर बांधकाम करून ती जागा परस्पर विकून फसवणूक करण्यार्या भाळवणी (ता. नगर) येथील व्यक्ती विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून खरेदी खत रद्द करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे सोनवणे यांनी केली आहे.
सोनवणे यांचा गव्हर्मेंट सिव्हिल कॉन्ट्रॅक्टरचा व्यवसाय आहे. तर भाळवणी येथील व्यक्तीला इमारत बांधायची होती. हे बांधकाम 25 हजार स्क्वेअर फूट असून प्रति चौरस फूट 1 हजार 251 रुपये प्रमाणे सुपर बिल्ट मटेरियल सहित करण्याचे ठरले त्यास अनुसरून साक्षीदारा सक्षम नोटरी करून देखील घेतली. या बांधकामाची एकूण किंमत 3 कोटी 12 लाख देण्याचे ठरले होते. सदरची रक्कम व बांधकामाचा तपशील व ज्या टप्प्याप्रमाणे बांधकाम होईल, त्यानुसार वेळोवेळी रक्कम देण्याची अट करारनाम्यात मान्य केली आहे.
तसेच दोन मजली आरसीसी इमारत बांधकाम पूर्ण केले आहे. त्यासाठी 1 कोटी 10 लाख 2244 रुपये इतका खर्च झालेला आहे. या मिळकतीचे मालकांनी 32 लाख 23 हजार 392 रक्कम दिलेली आहे. वास्तविक मुद्दल रक्कम 77 लाख 78 हजार 852 रुपये यांच्याकडून घेणे बाकी आहे. असे असताना त्यांनी फसवणूक करण्याच्या हेतूने तसेच सोनवणे यांना माहिती होऊ न देता बेकायदेशीपणे बांधकाम झालेलल्या इमारतीची विक्री केली. याबाबत त्यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी धमकी देत आर्थिक फसवणूक केल्याचे सोनवणे यांचे म्हणणे आहे.