Saturday, May 17, 2025
Homeनगरसव्वा तीन लाखाच्या बांधकाम साहित्याची चोरी

सव्वा तीन लाखाच्या बांधकाम साहित्याची चोरी

बालिकाश्रम रस्त्यावरील घटना || तोफखाना पोलिसात गुन्हा दाखल

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

व्यावसायिकाने त्यांच्या नवीन घराच्या बांधकामासाठी आणलेले तीन लाख 28 हजार रूपयांचे साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरून (Theft) नेल्याची घटना बालिकाश्रम रस्त्यावरील फुलारी मळ्यातील साई कॉलनीत घडली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात (Topkhana Police Station) चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यावसायिक चेतन पोपटलाल बळगट (वय 50 रा. साई कॉलनी, फुलारी मळा, बालिकाश्रम रस्ता) यांनी फिर्याद दिली आहे.

बळगट यांचे त्यांच्या घरासमोरच नवीन घराचे बांधकाम सुरू आहे. त्याठिकाणी देखरेखकरीता किशोर धोत्रे (रा. प्रेमदान हाडको) हा असून त्याने रविवारी (दि. 19) सायंकाळी साडेपाच वाजता बांधकामाला पाणी मारले व आरामासाठी बळगट यांच्या जुन्या घरासमोर आला. त्यावेळी बांधकामासाठी आणलेले साहित्य तेथील उघड्या खोलीत ठेवलेले होते. त्यानंतर दुसर्‍या दिवशी सोमवारी (दि. 20) सकाळी साडेसहा वाजता धोत्रे बांधकामावर पाणी मारण्यासाठी गेले असता त्यांना बांधकामाचे साहित्य दिसून आले नाही. त्यांनी बळगट यांना माहिती दिली.

त्यांनी पाहणी केली असता दोन लाख रूपये किमतीचे लाईट फिटिंगचे वायरचे बंडल, एक लाख 24 हजार रूपये किमतीचे एसीचे तीन इनर मशीन नग, चार हजाराचे एक कटर मशीन व एक ड्रिल मशीन असा एकुण तीन लाख 28 हजार रूपये किमतीचा ऐवज चोरीला गेल्याचे लक्ष्यात आले. बळगट यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात (Topkhana Police Station) दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरूध्द चोरीचा गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

आम

Aam Admi Party: दिल्लीत आम आदमी पक्षाला मोठा झटका; वरिष्ठ नेत्यांकडून...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi दिल्लीतील सत्ता गमावणाऱ्या अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षात फूट मोठी पडली आहे. दिल्ली महापालिकेत पक्षातील अनेक वरिष्ठ नेत्यांनी...