Monday, October 14, 2024
Homeधुळेतिहेरी अपघातात कंटेनर चालक ठार, ट्रक चालकावर गुन्हा

तिहेरी अपघातात कंटेनर चालक ठार, ट्रक चालकावर गुन्हा

धुळे । dhule। प्रतिनिधी

शहरातील नगावबारी परिसरात मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलावर काल तिहेरी अपघात (triple accident) झाला. त्यात गंभीर जखमी होवून कंटेनर चालकाचा (Container driver) मृत्यु (killed)झाला. याप्रकरणी ट्रक चालकाविरोधात (truck driver) गुन्हा (crime) दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

नगावबारीतील अजमेरा महिला वसतीगृहासमोर असलेल्या उड्डाणपुलावर एमएच18-एए 6411 क्रमांकाच्या ट्रकवरील चालक रोहिदास शांताराम पाटील (रा.दंडेवाला बाबा नगर) याने बेजबादारपणे भररस्त्यावर ट्रक उभा केला. या ट्रकला मागून येणार्‍या एन.एल.01-एल 9433 क्रमांकाच्या कंटेनरने धडक दिली. त्यामुळे कंटेनर फेकला जावून समोरून येणारा एम 23 डब्ल्यु.3497 क्रमांकाच्या कंटेनरला धडक दिली.

त्यामुळे कंटेनर दुभाजकावर धडकला. त्यात कंटेनरमधील चालक अडकून जखमी झाला. त्याला उपचारार्थ रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करीत मृत घोषित केले. याबाबत पोकॉ. हरीष सोनवणे यांनी दिलेल्याफिर्यादी अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी ट्रक चालकाविरूध्द देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या