Friday, December 13, 2024
Homeनाशिकमोसमी पाऊस अंदमानात दाखल

मोसमी पाऊस अंदमानात दाखल

महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या आठवड्यात आगमन

पुणे / मुंबई । वृत्तसंस्था Mumbai

मे महिन्यांतील उन्हाच्या झळांनी सारा देश हैराण झाला असताना हवामान विभागाने नैऋत्य मोसमी पावसाच्या (मान्सून) आगमनाची आनंदवार्ता दिली आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज (दि.19) मोसमी पाऊस अंदमानात दाखल झाला आहे. केरळात मोसमी पाऊस 31 मेस दाखल होणार आहे. महाराष्ट्रात त्याचे आगमन जूनच्या पहिल्या आठवड्यात होईल, असे हवामान विभागाने म्हटले आहे.

- Advertisement -

मोसमी पाऊस अंदमानात दरवर्षी 22 मेपर्यंत दाखल होतो. यावर्षी तो तीन दिवस आधीच पोहोचला आहे. मे महिन्यातील असह्य उकाड्याने हैराण झालेल्या जनतेला मोसमी पावसाची आस लागते. चालूवर्षी मोसमी पाऊस अंदमान निकोबार बेटांवर नियोजित वेळेपूर्वी दाखल होईल, असे भाकित हवामान विभागाने वर्तवले होते. एवढेच नव्हे तर 19 मे स हा पाऊस अंदमानातील पोहोचेल, असेही म्हटले होते. ते भाकित आज खरे ठरले आहे.

अंदमान, मालदीव, कोमोरिनच्या काही भागात मोसमी पाऊस दाखल झाला आहे. बंगालच्या उपसागराच्या काही भागातही तो पोहचला आहे. त्यामुळे अंदमानात पर्जन्यवृष्टी सुरु झाली आहे. याबाबत हवामान विभागाचे पुणे विभागप्रमुख के. एस. होसाळीकर यांनी मोसमी पावसाच्या आगमनाबाबत ट्विट केले आहे. अंदमानात दाखल झाल्यानंतर पावसाची देवभूमी केरळच्या दिशेने वाटचाल सुरु होणार आहे. अंदमानातून केरळपर्यंत पोहचण्यास मधून नैऋत्य मोसमी वार्‍यांना सुमारे दहा दिवस लागतात. मोसमी पावसाच्या वाटचालीत सातत्य राहिले तर 31 मेपर्यंत तो केरळात दाखल होईल.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या