Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रमोठी बातमी! वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरांच्या आईला 'या' तारखेपर्यंत पोलीस कोठडी

मोठी बातमी! वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरांच्या आईला ‘या’ तारखेपर्यंत पोलीस कोठडी

मुंबई | Mumbai

- Advertisement -

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरची (Pooja Khedkar) आई मनोरमा खेडकर (Manorama Khedkar) यांना आज (दि.१८ जुलै) रोजी सकाळी पोलिसांनी रायगडमधून अटक (Arrested) केली होती. त्यानंतर पोलिसांनी त्यांना वैद्यकीत तपासणीसाठी ससून रूग्णालयात नेण्यात आले होते.

हे देखील वाचा : IAS वादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकरांच्या आईला अटक

यानंतर मनोरमा खेडकर यांना न्यायालयात (Court) हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची म्हणजेच (दि.२०) जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. खेडकर यांनी जमिनीच्या वादातून एका शेतकऱ्याला बंदूक हातात घेऊन धमकावले होते. यानंतर पुणे पोलिसांनी घराला कुलूप असल्याने फोनवरून खेडकर यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता.मात्र, त्यांचा फोन लागत नसल्याचे पोलिसांनी सांगितले होते.

हे देखील वाचा : Vidhan Sabha Election 2024 : विधानसभेसाठी मुंबईतील ‘या’ २५ जागांवर ठाकरेंच्या शिवसेनेची तयारी

दरम्यान, यानंतर खेडकर कुटुंबाच्या पुणे आणि आजूबाजूला असणाऱ्या फार्म हाऊसवर पुणे पोलिसांनी (Pune Police) मनोरमा यांचा शोध घेतला होता. पंरतु, त्या आढळून आल्या नव्हत्या. त्यानंतर अखेर आज सकाळच्या सुमारास पोलिसांनी मनोरमा खेडकर यांना महाडमधून अटक केली होती. यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने मनोरमा खेडकर यांना २० जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या