Tuesday, September 17, 2024
Homeमहाराष्ट्रIAS वादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकरांच्या आईला अटक

IAS वादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकरांच्या आईला अटक

थोड्याच वेळात कोर्टात करणार हजर

मुंबई | Mumbai

- Advertisement -

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरची (Pooja Khedkar) आई मनोरमा खेडकर (Manorama Khedkar) यांना आज (दि. १८ जुलै) रोजी सकाळी पोलिसांनी रायगडमधून अटक (Arrested) केली आहे. काही दिवसांपूर्वीच मनोरमा खेडकर यांचा एक व्हिडीओ समोर आला होता. ज्यामध्ये त्या बंदूक हातात घेऊन एका शेतकऱ्याला जमिनीबाबत धमकावत असल्याचे समोर आले होते. त्याच प्रकरणात आता मनोरमा खेडकर यांना अटक करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

हे देखील वाचा : Vidhan Sabha Election 2024 : विधानसभेसाठी मुंबईतील ‘या’ २५ जागांवर ठाकरेंच्या शिवसेनेची तयारी

काही दिवसांपूर्वी पंढरीनाथ पासलकर यांनी फिर्याद दिल्यानंतर पुणे जिल्ह्यातील (Pune District) पौड पोलिसांनी मनोरमा खेडकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.पूजा खेडकर यांच्या IAS भरतीबाबत प्रश्न उपस्थित होत असतानाच त्यांची आई मनोरमा खेडकर यांचा एक व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओत मनोरमा खेडकर या एका शेतात जात एका शेतकऱ्याला बंदुकीचा धाक दाखवून धमकावत असल्याचे पाहायला मिळाले होते.

हे देखील वाचा : Nashik News : पहिने धबधब्यावर तरुणांमध्ये ‘दे दणादण’; Video व्हायरल

दरम्यान, मनोरमा खेडकर यांना अटक केल्यानंतर त्यांना वैद्यकीत तपासणीसाठी ससून रूग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर खेडकर यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. न्यायालयात हजर केल्यानंतर पुणे ग्रामीण पोलिस मनोरमा खेडकर यांच्या पोलिस कोठडीची मागणी करण्याची शक्यता आहे. यानंतर पोलीस पुढील तपास सुरू करतील अशी माहिती आहे.

हे देखील वाचा : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचे हेलिकॉप्टर ढगात भरकटले अन्…

त्या’ व्हायरल व्हिडीओनंतर मनोरमा खेडकरांवर गुन्हा दाखल

मुळशीतील एका शेतकऱ्याला पिस्तुल दाखवून दमदाटी केल्याप्रकरणी मनोरमा खेडकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर पुणे पोलिसांनी घराला कुलूप असल्याने फोनवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण फोनही लागत नसल्याचे पोलिसांनी सांगितले होते. तसेच खेडकर कुटुंबाच्या पुणे आणि आजूबाजूला असणाऱ्या फार्म हाऊसवर देखील पुणे पोलिसांनी शोध घेतला होता. त्यानंतर मनोरमा खेडकरांचा दुसरा एक व्हिडिओ समोर आला होता. त्यामध्ये मनोरमा या पोलिसांशी हुज्जत घालताना दिसल्या होत्या. यानंतर गुन्हा दाखल झाल्यावर पोलीस मनोरमा यांच्या पुण्यातील बाणेर येथील बंगल्यामध्ये पोहोचले होते. मात्र, मनोरमा यांनी पोलिसांना बंगल्यामध्ये प्रवेश दिला नाही. त्यानंतर गुन्हा दाखल झाल्यावर मनोरमा फरार झाल्याची माहिती समोर आली होती. यानंतर पोलिसांनी आज महाडमधून मनोरमा खेडकर यांना अटक केली.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या