Tuesday, March 25, 2025
Homeमुख्य बातम्याभाजप आमदाराचे राहुल गांधींबाबत वादग्रस्त विधान; म्हणाले, "त्यांना संसदेत कोंडून..."

भाजप आमदाराचे राहुल गांधींबाबत वादग्रस्त विधान; म्हणाले, “त्यांना संसदेत कोंडून…”

नवी दिल्ली | New Delhi

काही दिवसांपूर्वी झालेल्या संसदेच्या (Parliament) विशेष अधिवेशनादरम्यान लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी हिंदू धर्मासंदर्भात वक्तव्य केले होते.त्यांच्या या वक्तव्यामुळे लोकसभेत चांगलाच गदारोळ झाला होता. त्यानंतर आता राहुल गांधींच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देतांना कर्नाटक भाजपचे (BJP) आमदार भरत शेट्टी यांनी वादग्रस्त विधान केले आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहिर शाहाला पोलिसांनी केली अटक

एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार कर्नाटकमधील मेंगळुरू नॉर्थचे भाजप आमदार भरत शेट्टी (Bharat Shetty) यांनी म्हटले आहे की, “विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना संसदेत कोंडून मारायला हवे, असे केल्यास सात ते आठ एफआयआर (FIR) दाखल होतील. जर विरोधी पक्षनेते राहुल गांधी मेंगळुरू शहरात आले, तर आम्हीही त्यांच्यासाठी अशीच व्यवस्था करू, असे ते म्हणाले आहेत.

हे देखील वाचा : Maharashtra Rain Update : IMD कडून राज्यातील ‘या’ चार जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ जारी

तसेच शेट्टी पुढे म्हणाले की,हिंदू धर्माचे आणि संस्थांचे रक्षण करणे हे भाजपचे (BJP) कर्तव्य आहे. काँग्रेसने (Congress) हिंदू आणि हिंदुत्व वेगवेगळे आहे,असा संदेश द्यायला सुरुवात केली आहे. अशा नेत्यांपासून भविष्यात हिंदुंना धोका आहे.एवढेच नाही, तर राहुल गांधी ज्या भागाचा दौरा करतात, त्यानुसार आपली भूमिका बदलतात, असेही भरत शेट्टी यांनी म्हटले.

व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Maharashtra News : पानिपत येथे स्मारक उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती

0
मुंबई | प्रतिनिधी | Mumbai मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून पानिपत येथील कालाआंब परिसरात एक स्मारक (Memorial) उभारण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis...