Saturday, July 6, 2024
HomeनाशिकNashik Loksabha Election 2024 : आजी-माजी आमदारांच्या समर्थकांमध्ये बाचाबाची; परिस्थिती नियंत्रणात

Nashik Loksabha Election 2024 : आजी-माजी आमदारांच्या समर्थकांमध्ये बाचाबाची; परिस्थिती नियंत्रणात

नाशिक | Nashik

- Advertisement -

जिल्ह्यातील नाशिक आणि दिंडोरी या मतदारसंघासाठी (Dindori and Nashik Loksabha) आज पाचव्या टप्प्यात मतदान होत असून सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदानासाठी मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, अशातच शहरातील नाशिक मध्य मतदारसंघातील (Nashik Central Constituency) एका मतदार केंद्रावर दोन आजी-माजी आमदारांच्या समर्थकांमध्ये बाचाबाची झाल्याची घटना घडली.

शहरातील भद्रकाली पोलीस ठाण्यासमोर (Bhadrakali Police Station) भाजपच्या आमदार देवयानी फरांदे (Devyani Pharande) आणि माजी आमदार वसंत गीते (Vasant Gite) यांच्या समर्थकांमध्ये तू-तू मै-मै झाली. शहरातील मौलाना अब्दुल कलाम आझाद शाळा केंद्रावर मतदान (Voting) झाल्यानंतर लोक उभे राहत असल्याची तक्रार फरांदे यांनी केली. त्यानंतर दोन्ही बाजूंच्या समर्थकांकडून एकमेकांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे काही काळ मतदान केंद्रावर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, यानंतर पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण (Kiran Kumar Chavan) यांच्यासह भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यामुळे पुन्हा एकदा मतदान प्रक्रिया सुरळीतपणे सुरु झाली.

- Advertisment -

ताज्या बातम्या