नाशिक | प्रतिनिधी Nashik
गोदावरी नदीची आरती करण्यावरून आज सायंकाळी नाशिक पुरोहित संघ आणि रामतीर्थ समिती यांच्या सदस्यांमध्ये वाद निर्माण झाला. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर वादावर तूर्तास पडदा पडला आहे. दोन्हीकडील आरत्यांच्या वेळेत बद्दल करण्याचे सुतोवाच पोलिसांकडून करण्यात आल्याचे समजते.
पंचवटी परिसरात दररोज गोदावरी नदीची आरती करण्यात येते. नाशिकच्या गंगा गोदावरी पुरोहित संघाकडून रामकुंडावर तर जवळच असलेल्या दुतोंड्या मारुतीजवळ रामतीर्थ समितीकडून दररोज गोदा आरती करण्यात येते.
गोदावरीची आरती कोणी करावी, असा काही नियम नाही. हरिद्वार व अन्य ठिकाणी अनेक आरत्या केल्या जातात.
प्रफुल संचेती, रामतीर्थ गोदाआरती समिती.
गोदावरीची पारंपरिक आरती सुरु असताना दुसऱ्या बाजूस आरती सुरु करून साउंड सिस्टीमचा आवाज वाढवण्यात आला. नंतर अरेरावी करण्यात आली. एकाच वेळी दोन आरत्यांचा अट्टहास का?
प्रतिक शुक्ला, गंगा गोदावरी पुरोहित संघ.