Monday, July 22, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यातील सहकारी संस्थाची निवडणूक लांबणीवर

राज्यातील सहकारी संस्थाची निवडणूक लांबणीवर

मुंबई / प्रतिनिधी

- Advertisement -

कोरोनाचे संकट अजून दूर झाले नसल्याने राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका ३१ मार्च २०२१पर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतला आहे. त्यामुळे जिल्हा सहकारी बँका, साखर कारखाने, दूधसंघ आदींच्या निवडणुका आणखी लांबणीवर पडणार आहेत.

कोरोना विषाणूचा संसर्ग लक्षात घेऊन राज्यातील सहकारी संस्थाच्या निवडणुका सुरुवातीला ३० सप्टेंबरपर्यंत आणि त्यानंतर ३१ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता. आता पुन्हा ३१ मार्च २०२१पर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

कोरोना आटोक्यात येण्यास अजूनही काळ लागणार आहे. त्यामुळे निवडणुका पुन्हा पुढे ढकलण्यात येत असल्याचे राज्याच्या सहकार विभागाने सोमवारी प्रसिध्द केलेल्या आदेशात नमूद केले आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमातील तरतुदीनुसार कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमध्ये जनहिताच्या दृष्टीने सहकारी संस्थांच्या निवडणुका घेणे योग्य नाही. त्यामुळे राज्य सरकारकडे असलेल्या अधिकारांचा वापर करून राज्य सरकारने या निवडणुका पुढे ढकल्याण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या