Monday, May 27, 2024
Homeनाशिकपिंपळगाव बसवंत येथे आढळला 'पोवळा' साप

पिंपळगाव बसवंत येथे आढळला ‘पोवळा’ साप

पिंपळगाव बसवंत | प्रतिनिधी | Pimpalgaon Baswant

भारतात अतिशय दुर्मिळ असलेला ‘पोवळा’ साप (Coral Snake) पिंपळगाव बसवंत येथे आढळून आला आहे. येथील टोलनाका परिसरातील सुरज कुयटे यांच्या हॉटेलजवळ हा साप सापडला. त्यानंतर त्यांनी तात्काळ वन्यजीव रक्षक पिंटू पवार, स्वप्निल देवरे यांच्याशी संपर्क साधला असता ते तातडीने याठिकाणी पोहचले. यानंतर सर्प तज्ञ सुशांत रनशुर यांनी तो साप ‘पोवळा साप’ असल्याचे सांगितले.

- Advertisement -

‘पोवळा साप’ हा अत्यंत दुर्मिळ असून बिळामध्ये पाणी (Water) गेल्यावर पावसाळ्यात साप बाहेर पडून लोकवस्तीकडे येत असतात. काही लोक सापांना मारत असल्यामुळे दुर्मिळ सापांच्या जाती नष्ट होत चालल्या आहेत. त्यामुळे नामशेष होत चाललेले अनेक दुर्मिळ वन्यजीव परिसरात सापडत आहेत.

मंत्री छगन भुजबळांना जीवे मारण्याची धमकी; पुणे पोलिसांनी एकाला घेतले ताब्यात

दरम्यान, पिंपळगाव बसवंत येथील ‘पोवळा’ साप वनविभागाने पकडला असून वनविभागाचे (Forest Department) अधिकारी नाना चौधरी, विजय टेकनार यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाच्या हद्दीत सोडण्यात आला. तसेच क्वचित आढळणारा हा पोवळा साप याआधी कधीच या परीसरात सापडलेला नव्हता अशी माहिती रहिवाशांनी दिली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

उत्तर भारतात पावसाचा हाहाकार! नद्यांना पूर, अनेकांचा मृत्यू

कसा असतो पोवळा साप?

पोवळा सापाला हिंदीत कालाधारी मूंगा म्हणतात. इंग्रजीत त्याचे नाव कोरल स्नेक असे आहे. तर शास्त्रीय भाषेत त्याला कॅलीओपीस मेलानुरुस (Calliopfis Melanurus) म्हटले जाते. अतिशय दुर्मिळ जातीचा असणारा हा साप जाडीने कमी असतो. तसेच त्याचा रंग फिक्कट तपकिरी आणि डोके व मानेचा रंग काळा तर शेपटीवर दोन काळ्या कडी असतात. जमिनीखाली, गवत किंवा दगडांच्या खाली तो वास्तव्यात असतो. हा साप अतिशय विषारी असून तो मानवी वस्तीत आढळत नाही. हा साप दुर्मिळ असल्यामुळे त्याने दंश केल्याच्या घटना अभावानेच आढळतात. या सापाचे विष निरोटॉक्ससिक असल्यामुळे तो चावल्यास सूज येणे, चावलेला भागात यातना होणे. वीस ते तीस मिनिटांनी श्वसन क्रियेत अडथळा येऊन मृत्यू होणे असे प्रकार घडतात. वन्यजीव संरक्षण कायदा अंतर्गत वन्य जीवांच्या वर्गवारीत शेड्युल (२) मध्ये समाविष्ट आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या