Sunday, May 25, 2025
Homeनगरराजुरीत पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने गाव 7 दिवस बंद

राजुरीत पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने गाव 7 दिवस बंद

राजुरी (वार्ताहर)- राहाता तालुक्यातील राजुरी येथे करोना बाधित रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभुमीवर खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण गाव पहिल्या टप्प्यात दि. 6 जुलै ते दि. 12 जुलै 2020 या कालावधीत 100 टक्के लॉकडाऊन करण्यात येत आहे.

- Advertisement -

या कालावधीत गावातील दवाखाने व मेडिकल वगळता सर्व दुकाने, आस्थापना बंद राहणार आहेत. गावामध्ये कुणीही विना मास्क व काम नसताना विनाकारण फिरू नये, अत्यावश्यक कारणाशिवाय 5 पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येण्यास बंदी राहील.

दूध संकलन केंद्र चालकांनी दूध संकलन केंद्रावर सॅनिटायझरची व्यवस्था ठेवून व सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळूनच सकाळी व सायंकाळी 7 ते 8 वाजेदरम्यान सुरू ठेवावीत. कोणताही दुकानदार या कालावधीत चोरट्या पध्दतीने मालविक्री करताना आढळल्यास पहिल्या गुन्ह्यासाठी दुकानदारास 1000 रुपये दंड व ग्राहकास 500 रुपये दंड आकारण्यात येईल.

दुसर्‍या गुन्ह्याकरिता फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल याची गांभिर्याने नोंद घ्यावी, असे आवाहन ग्रामपंचायत व करोना कमिटीचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, ग्रामविकास अधिकारी, तलाठी व प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. तसेच ज्या वॉर्ड नंबर एक मधील रुग्ण सापडलेल्या भागात काही भाग बॅरिकेट लावून सील करण्यात आला आहे.

या भागातील अंदाजे 100 कुटुंबियांची वैद्यकीय अधिकारी, आशा वर्कर व अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्याकडून दररोज तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी यांनी दिली. गावातील स्थानिक करोना कमिटी या भागात बारीक लक्ष ठेवत असून या भागात निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : राहुरी-शनि शिंगणापूर रेल्वे मार्गाला मंजुरी

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar रेल्वे मंत्रालयाने महाराष्ट्रातील राहुरी ते शनि शिंगणापूर दरम्यान 21.84 किलोमीटर लांबीच्या नवीन रेल्वे मार्गाच्या निर्मितीसाठी मंजुरी दिली आहे. सुमारे 494.13 कोटी रुपयांच्या...