Friday, May 3, 2024
Homeनगरनगरमध्ये करोनाचा कहर; बाजारपेठ तीन दिवस बंद

नगरमध्ये करोनाचा कहर; बाजारपेठ तीन दिवस बंद

अहमदनगर – नगर शहरासह जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून करोनाबाधित रूग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. नगर शहर ही जिल्ह्याची बाजारपेठ असल्याने शहरात कायम मोठी वर्दळ असते. मात्र करोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेवून प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी नगरमधील बाजारपेठ उद्यापासून (दि. 28 ते 30) तीन दिवस स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती दि अहमदनगर आडतेबाजार मर्चंटस् असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र चोपडा व सेके्रटरी संतोष बोरा यांनी दिली.

करोनामुळे लागू झालेल्या लॉकडाऊन काळात प्रशासनाने नगरमध्ये व्यापार्‍यांना नेहमीच सहकार्य केले आहे. शहरात व जिल्ह्यातही रूग्णसंख्या वाढत असल्याने सर्वांनीच काळजी घेणे गरजेचे बनले आहे. त्यादृष्टीने रविवारपासून सलग तीन दिवस 30 जूनपर्यंत मार्केटयार्ड, आडतेबाजार, दाळमंडई, तापकिरगल्ली, दाणेडबरा व परिसरातील व्यापारी पेठ बंद ठेवण्यात येणार असल्याचे असोसिएशनने प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळवले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या