Thursday, March 27, 2025
Homeदेश विदेशकोरोनाचा कहर : जगात साडेचार लाखांपेक्षा अधिक पॉझिटिव्ह, 20 हजार मृत्यू

कोरोनाचा कहर : जगात साडेचार लाखांपेक्षा अधिक पॉझिटिव्ह, 20 हजार मृत्यू

नवी दिल्ली – जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या 4 लाख 60 हजारांहून अधिक असून मृतांची संख्या 20 हजारहून अधिक झाली आहे. जगात इटलीला सर्वाधिक फटका बसला असून साडेसात हजार लोकांना कोरोनाने मृत्यू झाला आहे.

काल दिवसभरात 683 लोकांचा इटलीत मृत्यू झाला. स्पेनमध्येही काल 656 लोकांचा बळी गेला. तर कोरोना विषाणूंचा संसर्ग झाल्यामुळे भारतात आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोना बाधितांची संख्या 687 झाली आहे.

- Advertisement -

यातील 642 जण अजूनही करोना पॉझिटिव्ह आहेत. 42 जण कोरोना मुक्त झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी दिली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

नाशिकला विमान देखभाल दुरुस्ती यंत्रणा कार्यान्वित

0
नाशिक | प्रतिनिधी Nashik नाशिक विमानतळावरून आता विमान देखभाल दुरुस्तीचे (एमआरओ) कामही गतिमान झाल्यामुळे अप्रत्यक्षपणे जगाच्या नकाशावर नाशिकचे नाव अधोरेखीत झाले आहे.विमान दूरुस्तीसाठी जगभरातून विमान...