Friday, May 3, 2024
Homeनगरकरोना योद्धा सांस्कृतिक नायक पुरस्कार जाहीर

करोना योद्धा सांस्कृतिक नायक पुरस्कार जाहीर

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद (Akhil Bharatiya Marathi Natya Parishad) अहमदनगर (Ahmednagar) शाखेच्यावतीने करोनाकाळात कलाविश्वाच्या मदतीसाठी धावलेले सांस्कृतिक योध्ये शशिकांत नजान, क्षितिज झावरे, तुषार चोरडिया, किरण खरात, सॅमसन अलसमराव यांना करोना योद्धा सांस्कृतिक नायक हा पुरस्कार जाहीर (Awards Announced) झाला आहे.

- Advertisement -

नाट्य परिषदेचे विश्वस्त व राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Trustee of Natya Parishad and Minister of State for Higher and Technical Education Uday Samant) यांच्या हस्ते त्यांचा गौरव होणार आहे, अशी माहिती नाट्य परिषदेचे अध्यक्षअमोल खोले व प्रमुख कार्यवाह सतीश लोटके यांनी दिली. करोना महामारीच्या काळात संचारबंदी असताना केवळ कलाकारांचे आर्थिक, कौटुंबिक, अडचणी दूर करण्यासाठी अहोरात्र श्रम करणार्‍या या योध्यानी रक्ताची नाती दूर जात असताना स्वतः अनेकांच्या परिवाराचे रक्षक म्हणून कार्य केले.

कोणी कलावंत उपाशी झोपू नये म्हणून किराणा किट, फूड पॅकेट वाटप करून मोठे कार्य केले, रूग्णांना रुग्णालयात दाखल करून औषधोपचार करण्यासाठीही या योध्यानी प्रयत्न केले. या योध्यांच्या कार्याला सन्मान द्यावा, या हेतूने नाट्य परिषद अहमदनगर शाखेने कोरोना योध्या सांस्कृतिक नायक या पुरस्कारासाठी या कलाकाराची निवड केली आहे.

19 नोव्हेंबर रोजी माऊली सभागृह अहमदनगर येथे दुपारी 1 वाजता आमदार संग्राम जगताप, (MLA Sangram jagtap) महापौर रोहिनीताई संजय शेंडगे (Mayor Rohini Shendge), उपमहापौर गणेश भोसले (Deputy Mayor Ganesh Bhosale) तसेच नाट्य परिषद पदाधिकारी, शहरातील जेष्ठ नाट्यकर्मी व नाट्य संस्थांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरण समारंभ होत आहे. रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रमुख कार्यवाह सतीश लोटके यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या