Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशदेशात एक लाखांपेक्षा अधिक करोनाग्रस्त

देशात एक लाखांपेक्षा अधिक करोनाग्रस्त

सार्वमत

नवी दिल्ली – केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात करोनाग्रस्त रुग्णांची संख्या 1 लाख 1 हजार 139 झाली आहे. त्यापैकी 3 हजार 163 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 39 हजार 174 जण करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. म्हणजेच देशाचा रिकव्हरी रेट 38.73 टक्के आहे. सध्या देशात करोनाची लागण असलेले म्हणजेच अ‍ॅक्टिव्ह रुग्ण 58 हजार 802 आहेत.
भारतात करोनाग्रस्त रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. आता देशभरातील करोना रुग्णांच्या संख्येने एक लाखाचा टप्पा पार केला आहे. गेल्या 24 तासांत 4 हजार 970 जणांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. तर 134 जणांचा मृत्यू झाला आहे.
देशभरात सर्वाधिक करोना रुग्णसंख्या महाराष्ट्रात आहेत. राज्यात सध्या करोनाग्रस्तांचा आकडा 35 हजार 058 झाला आहे. त्यातील 8 हजार 437 बरे झाले आहेत. महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट 24.06 टक्के आहे. तर राज्यात आतापर्यंत 1 हजार 249 जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

विविध राज्यांतील करोना रुग्ण संख्या

केरळ – 630 रुग्ण, त्यातील 497 बरे झाले, 4 मृत. रिकव्हरी रेट 78.88 टक्के, गेल्या आठ दिवसात केरळमध्ये रुग्णांची संख्या वाढल्याने रिकव्हरी रेट 94 टक्क्यांवरुन 78 टक्क्यांवर आला आहे.
तामिळनाडू – 11, 760 रुग्ण, त्यापैकी 4,406 बरे झाले, मृतांचा आकडा 81, रिकव्हरी रेट 37.46 टक्के
गुजरात – 11,745 रुग्ण, त्यामधील 4,804 बरे झाले, मृतांचा आकडा 694, रिकव्हरी रेट 40.90 टक्के
दिल्ली – 10, 054 रुग्ण, पैकी 4,485 बरे झाले, मृतांचा आकडा 168, रिकव्हरी रेट 44.60 टक्के
राजस्थान – 5, 507 रुग्ण, त्यातील 3,218 बरे झाले, मृतांचा आकडा 138, रिकव्हरी रेट 58.43 टक्के
मध्यप्रदेश – 5, 236 रुग्ण, त्यामधील 2,435 बरे झाले, मृतांचा आकडा 252, रिकव्हरी रेट 46.50 टक्के
पश्चिम बंगाल – 2, 825 रुग्ण, त्यापैकी 1006 बरे झाले, मृतांचा आकडा 244, रिकव्हरी रेट 35.61 टक्के

जगात भारत अकराव्या स्थानी
भारतात करोनाचा पहिला रुग्ण 30 जानेवारी रोजी आढळला होता. एका रुग्णापासून 10 हजार रुग्ण संख्या होण्यासाठी सुमारे अडीच महिन्याचा कालावधी लागला होता. भारतात 13 एप्रिल रोजी करोनाबाधितांचा आकडा 10 हजारांच्या पार गेला होता. पण मे महिन्यातील 16 आणि 17 तारखेला म्हणजे दोन दिवसातच करोनाचे 10 हजारांपेक्षा रुग्ण समोर आले आहेत. 17 मे रोजी 24 तासात 5 हजार 200 पेक्षा जास्त रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. तर 16 मे रोजी 4 हजार 800 पेक्षा जास्त रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं.
दरम्यान करोना रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत जगात भारत अकराव्या स्थानी आहे. तर सर्वाधिक करोनाचे रुग्ण अमेरिकेत आहेत.

जगातील विविध देशांची रुग्ण संख्या
अमेरिका – 15 लाख 08 हजार 598, रशिया – 2 लाख 90 हजार 678, ब्राझिल – 2 लाख 55 हजार 368, युनायटेड किंग्डम – 2 लाख 47 हजार 709, स्पेन – 2 लाख 31 हजार 606, इटली – 2 लाख 25 हजार 886, फ्रान्स – 1 लाख 80 हजार 051, जर्मनी – 1 लाख 76 हजार 551, तुर्की -1 लाख 50 हजार 593, इराण – 1 लाख 22 हजार 492, भारत – 1 लाख 1 हजार 139

- Advertisment -

ताज्या बातम्या