Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रपुण्यात आज ‘इतके’ करोना बळी

पुण्यात आज ‘इतके’ करोना बळी

पुणे

पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने 1024 रुग्ण आढळल्याने 1 लाख 47 हजार 351 एवढी रुग्ण संख्या झाली आहे. तर आज दिवसभरात

- Advertisement -

43 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आज अखेर 3 हजार 571 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या 1209 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर 1 लाख 27 हजार 639 रुग्ण करोना मुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात नव्याने 623 करोना बाधित रुग्ण आढळले असून 21 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 1 हजार 40 जण करोनातून बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण करोना बाधित रुग्णांची संख्या 79 हजार 338 वर पोहचली असून पैकी 67 हजार 63 जण करोनामुक्त झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या 3 हजार 784 येवढी आहे अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या