Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रपुण्यात आज ‘इतके’ करोना बळी

पुण्यात आज ‘इतके’ करोना बळी

पुणे –

पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने 549 रुग्ण आढळल्याने, 1 लाख 56 हजार 144 एवढी रुग्ण संख्या झाली आहे. तर आज दिवसभरात

- Advertisement -

21 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आज अखेर 3 हजार 920 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणारे 825 रुग्ण बरे झाल्याने, त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर 1 लाख 41 हजार 688 रुग्ण करोना मुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत देण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात 346 करोना बाधित रुग्ण आढळले असून 13 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 534 जण करोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 84 हजार 886 वर पोहचली असून पैकी 80 हजार 280 जण करोनातून बरे झाले आहेत. महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या 2 हजार 291 एवढी आहे अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या