Monday, May 27, 2024
Homeमहाराष्ट्रपुण्यात आज ‘इतके’ करोना बळी

पुण्यात आज ‘इतके’ करोना बळी

पुणे –

पुणे शहरासह पिंपरी-चिंचवडमध्ये देखील करोना रुग्णसंख्येह करोनामुळे होणार्‍या मृत्यूंचे प्रमाण वाढताना दिसत आहे. आज (शनिवार) दिवसभरात

- Advertisement -

पिंपरी-चिंचवडमध्ये 52 रुग्णांचा तर पुण्यात 39 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

पुणे शहरात आज दिवसभरात 1 हजार 658 नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. याचबरोबर एकूण करोनाबाधितांची संख्या 1 लाख 30 हजार 81 एवढी झाली आहे. तर आज दिवसभरात 39 रुग्णांचा मृत्यू झाल्याने आजअखेर मृत्यू झालेल्यांची संख्या 3 हजार 46 वर पोहचली आहे.

करोनावर उपचार घेणार्‍या 1 हजार 248 रुग्ण बरे झाल्याने, त्या सर्वांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज अखेर 1 लाख 9 हजार 371 रुग्ण करोनामुक्त झाले असल्याची माहिती, पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत देण्यात आली आहे.

दुसरीकडे पिंपरी-चिंचवड शहरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या 70 हजारांचा उंबरठ्यावर पोहचली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात 987 नवे करोनाबाधित रुग्ण आढळले. तर, 52 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू (यातील शहरातील 25 जण असून, महानगर पालिकेच्या हद्दीबाहेरील 27 जणांचा समावेश) झाला आहे.

आज दिवसभरात 903 जण करोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरातील एकूण बाधित रुग्णांची संख्या 70 हजारांच्या उंबरठ्यावर असून 69 हजार 423 वर पोहचली आहे. यापैकी, 54 हजार 432 जण करोनातून बरे झाले आहेत. महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 5 हजार 444 एवढी आहे, अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या