Friday, May 3, 2024
Homeनगरकोपरगाव : आज ‘इतके’ नवे करोना रूग्ण

कोपरगाव : आज ‘इतके’ नवे करोना रूग्ण

कोपरगाव (तालुका प्रतिनिधी) –

शहरासह तालुक्यात 8 ऑक्टोबर रोजी सापडलेल्या 13 करोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील 298 व्यक्तींची रॅपिड टेस्ट करण्यात आली. त्यात 8 रुग्ण तर

- Advertisement -

अहमदनगर नगर येथे पाठवलेल्या रूग्णपैकी 7 तसेच खासगी लॅब मधील 2 रुग्ण असे ऐकून 17 रुग्ण पॉझिटिव्ह आले. 21 रुग्ण करोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे तर शहरातील उपनगर असलेल्या सुभाष नगर मधील 65 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे.

कोपरगाव शहर व तालुक्यात करोना विषाणूचे दिवसात एकूण 17 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आहे. त्यात शहरातील इंदिरा नगर येथील 1, ओम नगर येथील 1, अंबिका नगर येथील 1, गांधी नगर येथील 1, सराफ बाजार येथील 1, मोहिनीराज नगर येथील 1, महादेव नगर येथील 1, दत्त नगर येथील 2, टाकळी फाटा येथील 2, तर ग्रामीण रवंदा येथील 2, सुरेगाव येथील 3, तिळवणी येथील 1 असे आज दिवसभरात ऐकून 17 रुग्ण करोना बाधित आढळून आले आहे. तर 21 रुग्ण करोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. कोपरगाव तालुक्यात आज 9 ऑक्टोबर पर्यंत ऐकून एक हजार 986 रुग्ण पॉझिटिव्ह झालेले असून त्यातील 83 रुग्ण ऍक्टिव्ह आहेत तसेच एक हजार 868 रुग्ण बरे झाले आहे. तर आज पर्यंत ऐकून 10 हजार 530 लोकांची करोना चाचणी करण्यात आली. कोपरगावात करोना पॉझिटिव्ह होणार्‍यांची 18.86 टक्के आहे. तर मृत्यू चे प्रमाण 1.81 टक्के असे आहे. तर 36 व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या