Tuesday, May 7, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात आज ‘इतके’ नवे करोना रुग्ण

राज्यात आज ‘इतके’ नवे करोना रुग्ण

मुंबई | Mumbai –

राज्यातील करोना रुग्णांची एकूण संख्या आता 10 लाख 15 हजार 681 इतकी झाली आहे. आज

- Advertisement -

24 हजार 886 नवे करोना रुग्ण आढळले आहेत. तर मागील 24 तासात 393 मृत्यूंची नोंद झाली आहे. या संख्येमुळे महाराष्ट्रातील एकूण करोना रुग्णांची संख्या 10 लाखांच्या पुढे गेली आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 7 लाख 15 हजार 23 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आत्तापर्यंत 28 हजार 724 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात 2 लाख 71 हजार 566 अ‍ॅक्टिव्ह केसेस आहेत. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

आज राज्यात 14 हजार 308 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आतापर्यंत 7 लाख 15 हजार 23 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 70.4 टक्के झाला आहे. तर राज्यातील मृत्यू दर हा 2.83 टक्के इतका झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 50 लाख 72 हजार 521 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 10 लाख 15 हजार 681 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 16 लाख 47 हजार 742 व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर 38 हजार 487 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात सध्याच्या घडीला 2 लाख 71 हजार 566 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आज राज्यात 24 हजार 886 नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या