Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात आज बाधितांपेक्षा करोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक

राज्यात आज बाधितांपेक्षा करोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक

मुंबई –

महाराष्ट्रात करोनाचा प्रादूर्भाव वाढत असतानाच महाराष्ट्राला सलग दुसर्‍या दिवशी मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्रात

- Advertisement -

मागील चोवीस तासांमध्ये 19 हजार 212 रुग्णांनी करोनावर मात केली आहे. तर 14 हजार 976 नवे करोनाबाधित मागील 24 तासांमध्ये आढळले आहेत. कालही करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या जास्त होती. आतापर्यंत राज्यात 10 लाख 69 हजार 159 रुग्णांनी करोनावर मात केली आहे. ज्यामुळे राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 78.26 टक्के इतका झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

मागील चोवीस तासात 430 जणांचा मृत्यू करोनाची लागण झाल्याने झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर 2.65 टक्के झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात 66 लाख 98 हजार 24 नमुन्यांपैकी 13 लाख 66 हजार 129 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

सध्या राज्यात 21 लाख 35 हजार 496 व्यक्ती या होम क्वारंटाइन आहेत तर 29 हजार 947 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात आज रोजी एकूण 2 लाख 60 हजार 363 अ‍ॅक्टिव्ह केसेस आहेत. तर राज्यात 14 हजार 976 रुग्ण हे नव्याने करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील करोना रुग्णांची एकूण संख्या 13 लाख 66 हजार 129 इतकी झाली आहे. मागील 24 तासांमध्ये नोंद झालेल्या 430 मृत्यूंपैकी 232 मृत्यू हे मागील 48 तासांमधले आहेत. तर 108 मृत्यू हे मागील आठवड्यातले आहेत. उर्वरित 9 मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत अशीही माहिती महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या