Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशCoronavirus : भारतात आजपर्यंत १.२२ कोटी रुग्ण करोनामुक्त

Coronavirus : भारतात आजपर्यंत १.२२ कोटी रुग्ण करोनामुक्त

दिल्ली | Delhi

देशभरात करोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. दिवसेंदिवस करोना बाधितांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. दरम्यान, देशात गेल्या २४ तासांत ९७ हजार रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत १.२२ कोटी रुग्ण करोनमुक्त झाले आहे.

- Advertisement -

केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात, गेल्या २४ तासात १ लाख ६१ हजार ७३६ रुग्णांची नोंद झाली आहे. तर ८७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण करोनाबाधित रुग्णसंख्या १ कोटी ३६ लाख ८९ हजार ४५३ वर पोहोचली आहे. तसेच देशात १२ लाख ६४ हजार ६९८ सक्रिय रुग्ण आहेत.

त्याचबरोबर, गेल्या २४ तासात ९७ हजार १६८ रुग्ण करोनमुक्त झाले असून आतापर्यंत १ कोटी २२ लाख ५३ हजार ६९७ करोना रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर १ लाख ७१ हजार ५८ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच देशात १० कोटी ८५ लाख ३३ हजार ८५ जणांचं लसीकरण झालं आहे.

दरम्यान, सोमवारी देशात एकाच दिवसात १ लाख ६८ हजार ९१२ करोना रुग्ण आढळले असून आतापर्यंतचा हा उच्चांक मानला जात आहे. १८ ऑक्टोबरपासूनचा हा उच्चांकी आकडा आहे.

महाराष्ट्रातही काल डिस्चार्ज झालेल्या रुग्णांची संख्या वाढ झालेल्या रुग्णांच्या तुलनेत जास्त होती. राज्यात काल ५१ हजार ७५१ करोना बाधित रुग्णांची वाढ झाली असून ५२ हजार ३१२ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण २८ लाख ३४ हजार ४७३ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी गेले असून ५ लाख ६४ हजार ७४६ रुग्नांवर उपचार सुरु आहे. दरम्यान काल राज्यात २५८ रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत ५८ हजार २४५ लोकांचा बळी गेला आहे. तसेच राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ८१.९४ टक्के झाले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या