Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशकरोनाचा विस्फोट! भारतात दोन लाखांहून अधिक रुग्णांची नोंद; महाराष्ट्रातील स्थिती काय?

करोनाचा विस्फोट! भारतात दोन लाखांहून अधिक रुग्णांची नोंद; महाराष्ट्रातील स्थिती काय?

दिल्ली | Delhi

देशात करोना रुग्णांच्या संख्येत मोठी भर पडताना दिसत आहे. देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेनं जेरीस आणलं असून, प्रचंड वेगानं संक्रमण होत आहे. दररोज मोठ्या संख्येने नवीन करोनाबाधित सापडत आहे.

- Advertisement -

देशात गेल्या २४ तासात करोना रुग्णवाढीचा आतापर्यंतचा उच्चांक नोंदवला गेला आहे. अवघ्या १० दिवसांत देशातील रुग्णवाढीचा वेग दुप्पट झाला आहे. देशात पहिल्यांदाच दोन लाखांहून रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे, करोनाच्या दुसऱ्या लाटेत लहानग्या रुग्णांचाही समावेश आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासात देशात तब्बल २ लाख ७३९ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशातील एकूण रुग्ण संख्या १ कोटी ४० लाख ७४ हजार ५६४ इतकी झाली आहे.

‘रेमडेसिवीर’बाबत WHO चा मोठा दावा!

तसेच गेल्या २४ तासात ९३ हजार ५२८ जण उपचारानंतर बरे झाले असून १०३८ जणांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत १ कोटी २४ लाख २९ हजार ५६४ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.

देशात सक्रिय रुग्नांची संख्या १४ लाख ७१ हजार ८७७ इतकी झाली असून मृतांची संख्या १ लाख ७३ हजार १२३ इतकी झाली आहे. तसेच देशात आतापर्यंत ११ कोटी ४४ लाख ९३ हजार २३८ जणांचं लसीकरण करण्यात आलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात काल ५८ हजार ९५२ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली असून ३९ हजार ६२४ जण तासांत करोनामुक्त झाले. तर २७८ मृत्यू झाले आहे.

राज्यातील एकूण रुग्ण संख्या ३५ लाख ७८ हजार १६० इतकी झाली असून २९ लाख ५ हजार ७२१ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर करोनामुळे ५८ हजार ८०४ जणांचा मृत्यू झाला. राज्यात सध्या ६ लाख १२ हजार ७० सक्रिय रुग्ण आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या