Saturday, May 18, 2024
Homeदेश विदेशकाळजी घ्या! भारतात करोनाबाधितांच्या संख्येतील वाढ कायम, महाराष्ट्रात वाढतोय Delta Plus चा...

काळजी घ्या! भारतात करोनाबाधितांच्या संख्येतील वाढ कायम, महाराष्ट्रात वाढतोय Delta Plus चा धोका

दिल्ली | Delhi

भारतात करोनाच्या दुसऱ्या लाटेना (Corona second wave) देशात हाहाकार माजवला होता. करोना रुग्णसंख्येने (Covid19 Patient) मोठा उच्चांक गाठला होता. दरम्यान, देशात आता करोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होताना दिसत होता. मात्र गेल्या दोन दिवसांपासून सलग ४० हजारांहून अधिक रुग्ण आहे.

- Advertisement -

आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health) दिलेल्या माहितीनुसार देशात गेल्या २४ तासांत ४४ हजार ६५८ नव्या रुग्णांची नोंद झाली असून ४९६ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच गेल्या २४ तासात ३२ हजार ९८८ रुग्ण करोनामुक्त झाले आहे. भारतातील एकूण रुग्णसंख्या ३ कोटी २६ लाख ०३ हजार १८८ इतकी झाली असून आतापर्यंत करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ३ कोटी १८ लाख २१ हजार ४२८ वर पोहोचली आहे. देशात सध्या ३ लाख ४४ हजार ८९९ सक्रिय रुग्ण उपचाराधिन असून आतापर्यंत ४ लाख ३६ हजार ८६१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

देशात आतापर्यंत ६१ कोटींपेक्षा जास्त नागरिकांना लस

भारतातील ६१ कोटी १० लाख ४३ हजार ५७३ जणांना करोना प्रतिबंधक लसीचा किमान एक डोस देण्यात आला. देशातील ४७ कोटी १९ लाख ५२० जणांना लसचा पहिला डोस देण्यात आला. तसेच देशातील १३ कोटी ९१ लाख ४३ हजार ५३ जणांना लसचा दुसरा डोस देण्यात आला आहे.

महाराष्ट्रात आता वाढतोय ‘डेल्टा प्लस’चा धोका (Delta plus increasing in Maharashtra)

करोनाच्या दोन्ही लाटेनंतर या विषाणूच्या ‘डेल्टा’ (Delta) आणि आता ‘डेल्टा प्लस’ (Delta plus) या नव्या प्रकाराचा विळखा वाढू लागला आहे. राज्यातील २४ जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत १०३ रुग्ण आढळले असून त्यातील पाचजणांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे मृतांमधील दोघांनी प्रतिबंधित लसीचे दोन्ही डोस घेतले होते, अशी माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली. सद्यःस्थितीत जळगाव जिल्ह्यात १३, रत्नागिरीत सर्वाधिक १५, कोल्हापूर जिल्ह्यात सात, ठाणे, पुणे, अमरावती, गडचिरोलीत प्रत्येकी सहा, नागपुरात पाच, नगरमध्ये चार, पालघर, रायगड, यवतमाळमध्ये प्रत्येकी तीन, नांदेड, गोंदिया, सिंधुदुर्ग व नाशिक जिल्ह्यात प्रत्येकी दोन, चंद्रपूर, अकोला, सांगली, नंदूरबार, औरंगाबाद, बीड, भंडारा जिल्ह्यात प्रत्येकी एक रुग्ण डेल्टा प्लस बाधित आढळला आहे. त्यापैकी रत्नागिरीतील दोन तर बीड, मुंबई, रायगडमधील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. लस घेऊनही ‘डेल्टा प्लस’ची बाधा होत असल्याने बूस्टर डोसची गरज व्यक्तत केली जात आहे.

दरम्यान राज्यात काल दिवसभरात ५ हजार १०८ नवीन रुग्णांची नोंद झाली. करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६४ लाख २ हजार ७८८ झाली आहे. तसेच सक्रिय रुग्णांची संख्या काहीशी वाढून ५० हजार ३९३ इतकी झाली. तर काल दिवसभरात ४ हजार ७३६ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून करोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ६२ लाख ५२ हजार १५० इतकी आहे. राज्यात काल १५९ रुग्ण दगावले असून राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर मृतांचा एकूण आकडा १ लाख ३६ हजार ७३० इतका झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या