Tuesday, January 6, 2026
HomeनगरAhilyanagar : नगरसेवक, नगराध्यक्ष पदासाठी खर्चमर्यादा वाढली

Ahilyanagar : नगरसेवक, नगराध्यक्ष पदासाठी खर्चमर्यादा वाढली

झेडपी सदस्य 9 लाख तर पंचायत समितीसाठी 6 लाख खर्च मर्यादा

मुंबई, अहिल्यानगर |प्रतिनिधी| Mumbai | Ahilyanagar

राज्य निवडणूक आयोगाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी उमेदवारांच्या निवडणूक खर्च मर्यादेत मोठी वाढ केली आहे. आधीच्या तुलनेत सुमारे दीडपट वाढ केल्याने अहिल्यानगर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. आयोगाच्या या निर्णयामुळे निवडणूक लढवणार्‍या उमेदवारांना प्रत्यक्ष निवडणूक प्रचारासाठी अधिक आर्थिक मोकळीक मिळणार आहे.

- Advertisement -

अहिल्यानगर जिल्ह्यात झेडपीचे 75 गट आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद सदस्यासांठी पूर्वी 6 लाख रूपये खर्च मर्यादा होती. ती आता 9 लाख रूपये करण्यात आली आहे. पंचायत समित्यांसाठी पूर्वी 4 लाख रूपये खर्च मर्यादा होती. ती आता 6 लाख रूपये करण्यात आली आहे. यापूर्वी जिल्हा परिषद निवडणुकांसाठी उमेदवारांसाठी सहा लाख रुपयांची आणि महापालिका निवडणुकांसाठी दहा लाख रुपयांची खर्च मर्यादा होती.

YouTube video player

क वर्ग नगरपरिषदांच्या नगरसेवक पदासाठी दीड तर ब वर्गसाठी 2 लाख होती. तर क वर्ग नगरपरिषदांच्या नगराध्यक्षांसाठी 5 तर ब साठी साडेसात लाख रूपये खर्च मर्यादा होती. मात्र, बदलत्या काळानुसार आणि वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर ही मर्यादा आता वाढवण्यात आली आहे. महागाई, प्रचार साधनांचे दर, डिजिटल माध्यमांवरील खर्च आणि वाहनभाडे यांसारख्या बाबींचा विचार करून आयोगाने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले आहे.

या आदेशानुसार अ वर्ग नगरपालिका थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतील उमेदवाराला 15 लाख तर सदस्यपदाची निवडणूक लढवणार्‍या उमेदवाराला पाच लाख रुपयांपर्यंत खर्च करता येईल. ब वर्ग नगरपालिका नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला 11 लाख 25 हजार तर सदस्य पदाच्या उमेदवाराला 3 लाख 50 हजार रुपये खर्च मर्यादा असणार आहे. क वर्ग नगरपालिकेत नगराध्यक्षपदासाठी साडेसात लाख तर नगरसेवक पदाच्या उमेदवाराला अडीच लाख रुपयांपर्यंत खर्च करण्याची परवानगी देण्यात आली आहे. नगर पंचायत निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा लाख तर सदस्य पदासाठी 2 लाख 25 हजार अशी मर्यादा घालण्यात आली आहे. अकोले नगरपंचायतची निवडणूक 2027 मध्ये होणार आहे.

2017 मध्ये संबंधित महापालिकेतील सदस्य संख्येच्या आधारे खर्च मर्यादा निश्चित करण्यात आली होती. त्यावेळी मुंबई महापालिका आणि 151 ते 175 सदस्य संख्या असलेल्या महापालिकेसाठी उमेदवाराला 10 लाख रुपये, 116 ते 160 सदस्य संख्या असलेल्या महापालिकेत आठ लाख रुपये, 86 ते 115 सदस्य संख्या असलेल्या महापालिकेत 7 लाख रुपये इतकी खर्च मर्यादा निश्चित करण्यात आली होती.

अशी असेल निवडणूक खर्च मर्यादा
श्रीरामपूर, कोपरगाव, संगमनेर
ब’ वर्ग नगरपरिषद : नगरसेवक 3.5 लाख, नगराध्यक्ष 11.25 लाख
राहाता, राहुरी, शिर्डी, श्रीगोंदा, पाथर्डी, जामखेड
‘क’ वर्ग नगरपरिषद: नगरसेवक 2.5 लाख, नगराध्यक्ष 7.5 लाख
नेवासा नगरपंचायत : नगरसेवक 2.25 लाख, नगराध्यक्ष 6 लाख

ग्रामपंचायत सदस्य संख्या थेट सरपंच सदस्य (प्रत्येकी)
1) 7 ते 9 सदस्य 75 हजार रु 40 हजार रु.
2) 11 ते 13 सदस्य 1.50 लाख रु. 55 हजार रु.
3) 15 ते 17 सदस्य 2.65 लाख रु. 75 हजार रु.

ताज्या बातम्या

रविंद्र

“माझ्या त्या वक्तव्याकडे…”; विलासरावांवरच्या ‘त्या’ वक्तव्यावर रविंद्र चव्हाणांची आज एका वाक्यात...

0
छ. संभाजीनगर | Chhatrapati Sambhajinagarमहाराष्ट्राचे माजी दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या आठवणी लातूरमधून पुसल्या जातील, अशी भाषा करणारे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना विलासरावांचा...