मनोहर कांडेकर
चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी
चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड येथे उपखेड फाट्या जवळ असलेल्या कापसाच्या गोडाऊनला अचानक आग लागून यात जवळपास २०० क्विटल कापूस जळून खाक झाल्याची माहिती मिळाली आहे. हि घटना आज दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. घटनेची माहिती देवून अजुनही घटनास्थळी आग विझविण्यासाठी अग्नीक्षमनचे बंब व पोलीस पोहचले नसल्याचे सांगण्यात येत आहे. ग्रामस्थ आग विझविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
25 लाखांचा साठा गुटखा जप्त ; अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई
या आगेत तब्बल १० ते १५ लांखाचा कापूसन जळून खाक झाला आहे. कळवाडी ता.मालेगाव येथील व्यापारी दादा वाणी यांच्या मालकीचा हा कापूस असून त्यांचे मोठे आर्थिक नूकसान झाले आहे. विशेष म्हणजे गेल्या १५ दिवसापूर्वी धुळे जवळील लळींग घाटात याच व्यापार्याचे अज्ञात चोरट्यांनी १२ लाखांची लुट केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. आता पुन्हा त्यांच्या गोडाऊनला आग लागल्यामुळे त्याचे मोठे आर्थिक नूकसान झाल्याचे बोलले जात आहे. घटनास्थळी माहिती देवूनही वेळेवर न पोहचणार्या पोलीस कर्मचारी व अग्नीक्षमन पथकातील कामचोर कर्मचार्यांवर कारवाईची मागणी होत आहे.
25 लाखांचा साठा गुटखा जप्त ; अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई