Tuesday, March 25, 2025
Homeनगरवेचणीला मजूर मिळत नसल्याने कपाशीवर रोटाव्हेटर फिरवण्याची नामुष्की

वेचणीला मजूर मिळत नसल्याने कपाशीवर रोटाव्हेटर फिरवण्याची नामुष्की

देवळाली प्रवरा |वार्ताहर|Deolali Pravara

पांढरे सोने म्हणून ओळख असलेल्या कपाशी पिकाची तालुक्यात बेसुमार लागवड झाल्याने यंदा कापूस उत्पादक शेतकर्‍यांची मोठी दैना झाली आहे. सुरुवातीला 10 रुपये किलो कापूस वेचणीचा भाव मजुराच्या तुटवड्यामुळे गगनाला भिडला असता तरी कापूस वेचणीला मजूर मिळेनासे झाल्याने हे पिक शेतकर्‍यांना यंदा नकोसे झाल्याने अनेकांना कपाशीवर रोटाव्हेटर फिरवल्या शिवाय पर्यायच उरला नाही.

- Advertisement -

सुरुवातीला हवामान अभ्यासकांनी यंदा पाऊस कमी पडण्याची व दुष्काळाची शक्यता व्यक्त केल्याने कमी पाण्याचे पीक म्हणून तालुक्यातील शेतकरी मोठ्याप्रमाणात कपाशी पिकाकडे वळला. कपाशी लागवडीनंतर जे काही थोडेफार पाणी विहीर व बोअरवेलमध्ये होते, त्या पाण्यावर या पिकांनी थोडाफार तग धरला. परंतु त्यानंतर मात्र विहिरींनी तळ गाठल्याने व बोअरवेल गुळण्यावर आल्याने शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. एकीकडे धरणाच्या पाणलोटक्षेत्रात धो-धो पाऊस तर दुसरीकडे लाभक्षेत्रात मात्र पावसाने पाठ फिरवल्याने पाण्यावाचून पिकांनी माना टाकल्याची वाईट परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु, ऑगस्ट महिन्यात वरुणराजाने कृपा केल्याने पाण्यावाचून आडवे पडलेले कपाशीचे पीक जोमाने वाढले. बहारलेलं पीक बघून बळीराजा आनंदी झाला.

कपाशी पीक ऐन बहरात आले.कपाशीची बोंडे मोठ्याप्रमाणात फुटली आणि पावसाने ऑक्टोबर महिन्यात काढणीला आलेला कापूस भिजवला. पावसाचे हे चक्र जवळ जवळ आठवडाभर सुरू होते. मुसळधार झालेल्या पावसाने कपाशी पिकात चिखल झाल्याने कापूस वेचणीला मोठ्याप्रमाणात ब्रेक लागला. सुरुवातीला वेचणीचा दर 10 रुपये किलो झाला. परंतु पावसाने उघडीप दिल्याने व कडक उन असल्याने सर्वत्र कपाशी मोठ्याप्रमाणात फुटल्याने सर्वत्र वेचणीला आली. याचा मजुरांनी फायदा घेऊन 10 रुपये किलो ची वेचणी 15 रुपये केली. या मध्ये मजुरांना येण्या जाण्यासाठी टेम्पोची व्यवस्था करावी लागत होती. तो रोजचा हजार ते बराशे रुपये वेगळाच खर्च इतके करुन देखील मजूर मिळेनासे झाल्याने अनेक शेतकर्‍यांचा कापूस शेतातच गळून पडला.

त्यामुळे मागेल तो भाव मजुरांना देऊन कापूस काढून घेण्याशिवाय शेतकर्‍यां समोर दुसरा पर्यायच उरला नाही. एकी कडे कापूस वेचणीचे दर वाढले असताना मात्र, कापूस खरेदी दर कोसळले होते. ओला व किडका कापूस असल्याचे कारण पुढे करुन खाजगी व्यापार्‍यांनी सहा हजार रुपये क्विंटलने कापूस खरेदी केली. पुढे पाऊस उघडल्यानंतरही फारसे दर वाढले नाही. सहा ते सात हजार असाच कापूस खरेदी दर राहीला. सहा – सात हजारांतून हातात फक्त तीन, साडेतीन हजार पडले. कपाशीवर झालेला खर्च काढला तर हातात काहीच राहीले नाही. जे काही मिळालं ते मजूर व व्यापारीच खाऊन गेले. शेतकर्‍यांच्या हातात काय राहीले व त्याच्या पदरात काहीच पडले नाही.

यंदा शेतीच्या कामासाठी लागणार्‍या महिला मजुरांचा मोठ्याप्रमाणात तुटवडा जाणवला. सरकारच्या धोरणांमुळे भविष्यात मजुरा आभावी शेती करणे कठीण होऊन बसणार आहे. यासाठी सरकारने शेतीचे संपूर्ण यांत्रिकीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा आधीच मोडकळीस आलेली शेती बंद पडण्यास वेळ लागणार नाही. असेच राहीले तर तो दिवसही दूर नाही.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी तेलंगणा येथून...