Tuesday, March 25, 2025
Homeनगरकापूस, सोयाबीन उत्पादकांना मिळणार 175 कोटींची मदत

कापूस, सोयाबीन उत्पादकांना मिळणार 175 कोटींची मदत

5 लाख 8 हजार 530 शेतकर्‍यांचा होणार फायदा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्यातील 2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांनी ई-पिक पहाणी लागवडीची नोंद केली. अशा नोंदणीकृत शेतकर्‍यांना राज्यातील महायुती सरकारने अर्थसहाय्य घोषीत केले असून नगर जिल्ह्यातील 5 लाख 8 हजार 530 सोयाबिन आणि कापूस उत्पादक शेतकर्‍यांना सुमारे 175 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर झाले असल्याची माहिती महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. राज्यातील महायुती सरकारने 2023 खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन उत्पादीत शेतकर्‍यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 1 हजार रुपये तर 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रती हेक्टर 5 हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार नगर जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकर्‍यांना 68.12 कोटी व सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांना 107.12 कोटी इतके अर्थसहाय्य मंजूर झाले असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

- Advertisement -

कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांनी सन 2023 च्या खरीप हंगामामध्ये ईपिक पहाणी लागवडीची नोंद केली असेल, अशा नोंदणीकृत शेतकर्‍यांना हे अर्थसहाय्य मिळणार असून, शेतकर्‍यांना ऑनलाईन प्रणाली व शेतकर्‍यांच्या आधार लिंक बँकखात्यामध्ये हे अर्थसहाय्य जमा करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. ही अर्थसहाय्याची योजना 2023 च्या खरीप हंगमातील कापूस व सोयाबीन शेतकर्‍यांसाठीच मर्यादीत असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी सुधाकर बोराळे यांनी सांगितले.

कापूस पिकाची मदत
अकोले तालुक्यातील 6 कापूस उत्पादक शेतकर्‍यांना 7 हजार 925, नगर 648 शेतकर्‍यांना 18 लाख 12 हजार रुपये, कर्जत तालुका 10 हजार 438 शेतकर्‍यांना 3 कोटी 9 लाख 36 हजार रुपये अनुदान, कोपरगाव 3 हजार 316 शेतकर्‍यांना 1 कोटी 11 लाख 81 हजार, जामखेड मधील 1 हजार 555 शेतकर्‍यांना 3 कोटी 6 लाख 44 हजार, नेवासेमधील 39 हजार 579 शेतकर्‍यांना 14 कोटी 41 लाख 88 हजार रुपये, पाथर्डी मधील 39 हजार 906 शेतकर्‍यांना 12 कोटी 48 लाख 50 हजार, पारनेर तालुक्यातील शेतकर्‍यांना 545 शेतकर्‍यांना 16 लाख 15 हजार 731 रूपये, राहाता तालुक्यातील 2 हजार 547 शेतकर्‍यांना 80 लाख 62 हजार, राहुरी तालुक्यातील 25 हजार 421 शेतकर्‍यांना 8 कोटी 39 लाख 7 हजार, शेवगाव तालुक्यातील शेतकर्‍यांना 44 हजार 921 शेतकर्‍यांना 15 कोटी 99 लाख 13 हजार तर श्रीगोंदा तालुक्यातील शेतकर्‍यांना 18 हजार 164 शेतकर्‍यांना 5 कोटी 68 लाख 5 हजार रुपये अनुदान, श्रीरामपूर तालुक्यातील 9 हजार 592 शेतकर्‍यांना 3 कोटी 50 लाख 60 हजार तसेच संगमनेर तालुक्यातील 7 हजार 34 शेतकर्‍यांना 19 कोटी 23 लाख 10 हजार रुपये असे 68.12 कोटीचे अर्थसहाय्य मिळणार आहे.

सोयाबीन पिकाची मदत
अकोले तालुक्यातील 33 हजार 345 सोयाबिन उत्पादक शेतकर्‍यांना 8 कोटी 93 लाख 16 हजार, नगर तालुक्यातील 28 हजार 737 शेतकर्‍यांना 11 कोटी 23 लाख 86 हजार, कर्जत तालुक्यातील 317 शेतकर्‍यांना 1 कोटी 11 लाख 40 हजार, कोपरगाव तालुक्यातील 37 हजार 953 शेतकर्‍यांना 15 कोटी 10 लाख 38 हजार, जामखेड तालुक्यातील 28 हजार 914 शेतकर्‍यांना 9 कोटी 43 लाख 11 हजार, नेवासा तालुक्यातील 20 हजार 428 शेतकर्‍यांना 8 कोटी 11 लाख 27 हजार, पाथर्डी 7 हजार 986 शेतकर्‍यांना 1 कोटी 84 लाख 59 हजार, पारनेर 35 हजार 70 शेतकर्‍यांना 10 कोटी 23 लाख, राहाता 36 हजार 263 शेतकर्‍यांना 14 कोटी 28 लाख, राहुरी मधील 13 हजार 842 शेतकर्‍यांना 4 कोटी 97 लाख 93 हजार, शेवगाव 618 शेतकर्‍यांना 19 लाख 73 हजार, श्रीगोंदा 1 हजार 847 शेतकर्‍यांना 5 कोटी 93 लाख 97 हजार, श्रीरामपूर 19 हजार 758 शेतकर्‍यांना 8 कोटी 87 लाख 11 हजार, संगमनेर तालुक्यातील 40 हजार 470 शेतकर्‍यांना 13 कोटी 18 लाख 96 हजार असे 107.12 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य महायुती सरकारने शेतकर्‍यांसाठी मंजूर केले आहे.

राज्यातील महायुती सरकार शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून विविध योजनांच्या माध्यमातून शेतकर्‍यांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे. सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकर्‍यांना अर्थसहाय्य करून पुन्हा एकदा शेतकर्‍यांप्रति असलेली बांधिलकी दाखवली आहे.
– ना. राधाकृष्ण विखे पाटील, महसूल तथा पालकमंत्री

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस...

0
कोल्हापूर | Kolhapur छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल...