Friday, May 3, 2024
Homeनगरपरवानाधारक दुकानांमध्ये भेसळयुक्त देशी दारु बनवण्याचा ‘रात्रीचा उद्योग’ उघडकीस

परवानाधारक दुकानांमध्ये भेसळयुक्त देशी दारु बनवण्याचा ‘रात्रीचा उद्योग’ उघडकीस

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा तालुक्यातील (Newasa Taluka) चार ठिकाणी राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने (State Excise Squad) टाकलेल्या छाप्यांमध्ये (Raid) देशी दारुच्या दुकानांमध्ये रात्री 11 ते पहाटे 4 या वेळेत चालणारा भेसळयुक्त दारु (Adulterated Liquor) बनवण्याचा उद्योग उघडकीस आला असून याबाबत 9 जणांना अटक (Arrested) करुन कारवाई करण्यात आली. 8 हजाराहून अधिक देशी दारुच्या बाटल्यांसह भेसळ (Adulterated) करण्याचे साहित्य, बुचे, बनावट लेबल आदी साहित्य जप्त (Seized) करण्यात आले.

- Advertisement -

याबाबत माहिती अशी की, राज्य उत्पादन शुल्कचे (State Excise Squad) आयुक्त कांतीलाल उमाप (Commissioner Kantilal Umap), उपायुक्त प्रसाद सुर्वे (Deputy Commissioner Prasad Surve) व अहमदनगरचे अधीक्षक गणेश पाटील यांचे मार्गदर्शनाखाली नेवासा तालुक्यातील (Newasa Taluka) नेवासा फाटा (Newasa Phata), नेवासा (Newasa), सलाबतपूर (Salabtpur) व घोडेगाव (Ghodegav) येथे चार देशी दारू किरकोळ विक्री परवानाधारक रवींद्र कत्तेवार हे त्यांच्या माणसांमार्फत रात्रीच्या सुमारास 11 ते पहाटे 4 वाजेपर्यंत अनुज्ञप्तीच्या ठिकाणीच (दुकानात) देशी दारू सीलबंद बाटल्यामधून थोडे थोडे वेगळे मद्य (Alcohol) काढून मद्य काढलेल्या बाटल्यात पाणी मिसळून परत पत्री बुचे सिलबंद करून काढलेले मद्य हे दुकानातील रिकाम्या असलेल्या 180 मिली काचेच्या बाटलीत भरून त्यास परत बनावट पत्री बुचे सीलबंद करून त्यापासून नवीन बॉक्स बनवल्यानंतर त्यास बनावट चिकटटेप चिकटवून हुबेहुब मूळ ब्रँड प्रमाणे मद्य व बॉक्स बनवत असल्याची माहिती मिळाल्यावरुन हे छापे टाकण्यात आले असता प्रवेशद्वार बंद करून वरील प्रमाणे ‘उद्योग’ सुरु असल्याचे दिसून आले.

नेवासा फाटा येथील अनुज्ञप्तीधारक रवींद्र कत्तेवार यांच्या सीएल-3 क्र.145/21-22 मध्ये प्रशांत सोडा (वय 26) रामपूर, रामय्या (आंध्रप्रदेश) व लिंगाया प्रशांत गौड (वय 36) निजामाबाद (आंध्रप्रदेश)व नरसिमलू पुठ्टा, (वय 36) निजामाबाद (आंध्रप्रदेश) या तिघा परप्रांतीय कामगारांकडून देशी दारुच्या बाटल्यांमध्ये भेसळ करुन बाटल्या सीलबंद केल्या जात असताना मिळून आले.

दारु दुकानात देशी दारू भिंगरी संत्रा व बॉबी संत्रा ब्रँडचे 180 मिलीक्षमता व 80 मिली क्षमतेच्या बाटल्यांना सीलबंद करण्याजोगे पत्री बुचे आरे (थ्रेड) असलेली तसेच तसेच सीलसह असलेली एकूण 300 पत्री बनावट बुचे मिळून आली तसेच भिंगरी संत्रा, बॉबी संत्रा या ब्रँडचे बनावट चिकट टेप मिळून आले. भेसळयुक्त देशी दारु भिंगरी संत्रा 180 मिली क्षमतेच्या 3555 सीलबंद बाटल्या व देशी दारू, बॉबी संत्राच्या सीलबंद बाटल्या मिळून आल्या.

अनुज्ञप्ती ठिकाणीच 750 मिली क्षमतेचे एकूण 36 काचेच्या बाटलीत भेसळयुक्त मद्य मिळून आले. यास झाकणे बसवलेली नव्हती तसेच तीन पाण्याचे जार व जवळपास अर्धा किलो वजनाचे सील तुटलेले तुकडे दिसून आले.

सलाबतपूर येथील देशी दारू दुकानात अनुज्ञप्ती ठिकाणाच्या बाजूस असलेल्या खोलीमध्ये प्रशांत राधेशाम गौड (वय 23), रा.जि.करिमनगर (तेलंगाणा) ह.मु. एस. एस. पटेल यांचे देशी दारू दुकानाचे बाजूस असलेल्या खोलीमधून देशी दारू संत्रा 180 मिली क्षमतेचे 717 बुचे व 180 मिली क्षमतेच्या 300 रिकाम्या बाटल्या, 1 लोखंडी बादली तसेच 1 लिटर क्षमतेच्या 9 बाटल्यांमध्ये भेसळयुक्त मद्य मिळून आले.

घोडेगाव येथील अनुज्ञप्तीधारक बी.एम.कलाल येथे छापा टाकला असता भिंगरी संत्रा 180 मिली क्षमतेच्या एकूण 4128 बाटल्या असे एकूण 86 बॉक्स तसेच 750 मिली क्षमतेच्या 30 काचेच्या बटलीत देशी देशी दारु भिंगरी संत्रा सिलबंद बाटल्या लेबल खराब झालेल्या अवस्थेत मिळाल्या देशी दारु भिंगरी संत्राचे 775 बनावट बुचे, एल-लोखंडी दाबण तसेच 3 भिंगरी संत्रा ब्रँडचे चिकटटेप तसेच 1 मग, 1 दाभण, 20 लिटर क्षमतेचे प्लॅस्टीक बादलीमध्ये पाणी मिळून आले.

नेवासे येथील देशी दारू किरकोळ विक्री सीएल-3 क्रमांक 49/21-22 येथे छापा टाकला असता अनुज्ञप्तीमध्ये इसम मिळून आले परंतु बातमीप्रमाणे अक्षेपार्ह मद्यासाठी बनावट झाकणे वगैरे काही मिळून आले नाही परंतु निरीक्षणामध्ये आढळून आलेल्या त्रुटींबाबत विभागीय पथकाने गुन्हा नोंदविला.

सदर कार्यवाहीमध्ये एन. बी.शेंडे, उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क कोळपेवाडी, प्रभारी उपअधीक्षक बी.टी.घोरतळे, राज्य उत्पादन शुल्क अहमदनगर निरीक्षक श्री. राख, अनिल पाटील, अण्णासाहेब बनकर, संजय कोल्हे, श्री. मस्करे, हांडे, कोंडे, भगत, नम्रता वाघ, सुशीला चव्हाण, बारवकर, बडदे, अहिरराव, छत्रे, विधाते, सुनिल वाघ, करंजुले, के. के. शेख, गारळे, ठुबे, श्री. पाटोळे, उके, सुरज पवार, मडकेस दिलीप पवार, प्रविण सागर, साळवे, महिला जवान श्रीमती काळापगाड, आठरे, अकोलकर, वर्षा जाधव, वराट तसेच वाहनचालक विपुल कर्पे, श्री. खुळे यांनी मोहिमेत भाग घेऊन मोहिम यशस्वीरित्या राबविण्यात आली.

- Advertisment -

ताज्या बातम्या