Saturday, June 29, 2024
HomeनाशिकNashik-Dindori Constituency 2024 : मतदान टक्का वाढल्याने उमेदवारांची उत्सुकता शिगेला

Nashik-Dindori Constituency 2024 : मतदान टक्का वाढल्याने उमेदवारांची उत्सुकता शिगेला

नाशिकला ३० तर दिंडोरीसाठी २६ फेर्‍यांतून मतमोजणी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

नाशिक व दिंडोरी लोकसभा (Nashik and Dindori Loksabha) मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढल्यानंतर आता निकालाची (Result) उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दिंडोरीत मतमोजणीच्या २६ फेर्‍या तर नाशिकमध्ये ३० फेर्‍या होणार आहेत. त्यामुळे दिंडोरीचा निकाल दुपारी १ वाजेपर्यंत तर नाशिकचा निकाल सायंकाळपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे.

नाशिक लोकसभेसाठी (Nashik Loksabha) ६१ टक्के तर दिंडोरीसाठी ६२.६६ टक्के मतदान (Polling) झाले. गेल्या पाच वर्षांत मतदारांची (Voter) संख्याही वाढली आणि मतदानाचा टक्काही वाढला. त्यामुळे एकूण मतदारांचे प्रमाण कमी दिसत असले तरी २०१९ च्या तुलनेत जास्त मतदान झाल्याने प्रशासनाने सुटकेचा निश्वास टाकला आहे. मतदान झाल्यानंतर आता उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींकडून विश्लेषण, राजकीय तज्ज्ञांद्वारे तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

सकाळी ८ पासून मतमोजणी

आता सर्वांचे लक्ष निकालाकडे केंद्रीत झाले आहे. अंबड एमआयडीसीतील केंद्रीय वखार महामंडळाच्या गोडावूनमध्ये मतमोजणीची व्यवस्था करण्यात आली आहे. ४ जूनला सकाळी ८ वाजता मतमोजणीस प्रारंभ होईल. प्रथमत: पोस्टल मतदारांनी केलेल्या मतदानाची मोजणी होईल. यानंतर इव्हीएममध्ये बंदिस्त मतमोजणीस प्रारंभ होईल. त्यासाठी प्रत्येक विधानसभा निहाय १४ टेबल असणार आहेत. प्रत्येक टेबलवर उमेदवारांचा एक प्रतिनिधी असेल, याप्रमाणे प्रत्येक उमेदवाराला सहा विधानसभा मतदारसंघासाठी एकूण ८४ प्रतिनिधी नियुक्ती करण्याची लगबग काल पहायला मिळाली.

मोबाइल, लॅपटॉपला बंदी

मतमोजणी होणार्‍या स्ट्रँगरूम परिसराच्या १०० मीटर परिसरात मोबाइलसह लॅपटॉक नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. कोणतीही घातक वस्तू नेण्यासही बंदी करण्यात आली आहे. एखाद्या व्यक्तीकडे अथवा उमेदवाराच्या प्रतिनिधीकडे असे काही आढळल्यास ती जप्त करण्यात येईल तसेच त्या व्यक्तीस प्रवेशही नाकारण्यात येऊ शकतो.

मतमोजणी कक्षात एसी बसवा

अंबड एमआयडीसीतील केंद्रीय वखार महामंडळाच्या गोडावूनमध्ये मतमोजणी होणार असल्याने त्याठिकाणी एसी बसवण्याची मागणी महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रतिनिधींकडून करण्यात आली आहे. यासंदर्भातील पत्र त्यांनी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांना दिले आहे.

स्ट्राँगरूम परिसरात सीआरपीएफच्या दोन तुकड्या आणि लष्करी जवान तैनात करण्यात आले आहे. दुसर्‍या व तिसर्‍या स्तरात महाराष्ट्र शासनाचे कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत. मतदान केंद्रात जाणार्‍या प्रत्येक व्यक्तीची तपासणी करण्यात येईल. प्रतिबंध केलेल्या वस्तू आढळल्यास कारवाई करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

बाबासाहेब पारधे, निवडणूक निर्णय अधिकारी, दिंडोरी

अशा होतील फेऱ्या

नाशिक लोकसभा

मतदारसंघ मतदान केंद्र फेऱ्या
सिन्नर ३२१ २३
नाशिक पूर्व ३२६ २४
नाशिक मध्य २९५ २२
नाशिक पश्चिम ४१० ३०
देवळाली २६९ २०
इगतपुरी २८९ २१
एकूण १९१०

दिंडोरी लोकसभा

मतदारसंघ मतदान केंद्र फेऱ्या
नांदगाव ३३१ २३
कळवण ३४५ २४
चांदवड २९६ २२
येवला ३२० ३०
निफाड २७३ २०
दिंडोरी ३५७ २१
एकूण १९२२

सेवक संख्या

ईव्हीएम मतमोजणी३७५
पोस्टम मतमोजणी ६०
टॅब्युलेशन ७५
एकूण ४८५

प्रत्येक मतमोजणी टेबलवर एक याप्रमाणे

एकूण पर्यवेक्षक ८४
एकूण सहाय्यक ८४
मतमोजणी कर्मचारी ८४
मायक्रो निरीक्षक ८४
एकूण ३३६
या व्यतिरिक्त १० टक्के अतिरिक्त
- Advertisment -

ताज्या बातम्या