सोनगीर Songir । वार्ताहर
मुंबई-आग्रा महामार्गावरून अवैधरित्या दारूची वाहतूक (Illegal transportation of liquor) करणार्या कारला (car) सोनगीर पोलिस ठाण्याच्या पथकाने (police station team) सापळा रचून (setting a trap) पकडले. पाच लाखांची कार व एक लाखांची देशी दारू (Country liquor) असा एकूण सहा लाख नऊ हजार 440 रूपयांचा मुद्देमाल जप्त (seized) करण्यात आला. याप्रकरणी चार जणांविरुध्द सोनगीर पोलीस ठाण्यात गुन्हा (crime) दाखल करण्यात आला आहे.
न्यायालयाचा अवमान : तत्कालीन पोलीस अधीक्षकांंसह उपअधीक्षक, पोलीस निरीक्षकांना नोटीस
एम.एच.48 एफ 4568 क्रमांकाच्या कारमधून अवैधरित्या दारूची वाहतुक केली जात असल्याची गोपनिय माहिती सोनगीर पोलीस ठाण्याचे एपीआय चंद्रकांत पाटील यांना मिळाली. त्या माहितीवरुन पथकाने महामार्गावरील सोनगीर टोल नाक्याजवळ सापळा लावला. त्यावेळी संशयित वाहन आले असता त्याला थांबविले. चालक नरेंद्र भिला कोळी (रा.खामखेडा, ता.शिरपुर) याला ताब्यात घेवून कारची तपासणी केली असता त्यात देशी दारू टँगोपंच नाव असलेले खाकी रंगाचे एकूण 30 बॉक्स व प्रत्येक बॉक्समध्ये देशी दारूदारूच्या 180 मिली क्षमतेच्या काचेच्या 48 बाटल्या भरलेल्या आढळून आल्या. एक लाख नऊ हजार 44 रूपयांची दारू व पाच लाखांची कार जप्त करण्यात आली.
बालिकेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न करणार्यास सात वर्षांची शिक्षामनाेरंजन: दीपिका सर्कसमधुन लावणार ४४० ला करंट : पहा टिझर
याप्रकरणी सोनगीर पोलीस ठाण्यात नरेंद्र भिला कोळी (वय 33, रा. खामखेडा)व नारायण अशोक माळी, पिंटू भिल व मनोज महाजन सर्व रा.शिरपुर यांच्याविरूद्ध महाराष्ट्र दारू बंदी अधिनियम 1849 चे 65 (अ) (ब) (ड) (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
गुंगीचे औषध पाजून तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्नVISUAL STORY : आणि अभिनेत्री सायली संजीवने उघड केलं गुपित
सदर कारवाई पोलीस अधिक्षक संजय बारकुंड, अप्पर पोलीस अधिक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदिप मैराळे, एलसीबीचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोनगीर पोलीस ठाण्याचे सहाय्यकपोलीस निरीक्षक चंद्रकात पाटील, पोलीस उपनिरीक्षक रविंद्र महाले, पोहेकॉ. संजय देवरे, पोना. अमरीश सानप, पोकॉ. सुरज सावळे, विजय पाटील, राकेश ठाकुर, किरण पारधी यांच्या पथकाने केली.
VISUAL STORY : शहनाज आणि विकीच्या केमिस्ट्रीची होतेय चर्चा